मेडीकेयर च्या विरोधात 30 पासून यवतमाळ येथे उपोषण प्रारंभ..
प्रतिनिधी.पुसद
येथील मेडिकेयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णा सोबत उपचारा दरम्यान व्यवस्थित उपचार झाले नसल्याने त्यात हॉस्पिटल च्या निष्काळजी पणा मुळे रुग्णाचा मृत्यू झाला सदरील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर कार्यवाही व्हावी या करिता सोमवार दिनांक 30 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालया समोर उपोषण प्रारंभ करण्यात येणार आहे त्याचे झाले असे की पी एम उर्फ पंजाबराव हनवते यांना सदरील रुग्णालयात मागील वर्षी 17 जुलै 2020 ला तपासणी करिता आणले होते तेथील डॉ संजयअग्रवाल यांनी काय तपासणी केली ते समजले नाही परंतु रुग्णाला 1दिवस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट राहुद्या दुसऱ्या दिवशी त्याना सुट्टी देऊ असे म्हटल्याने त्याना तेथे ठेवले असता दुसऱ्या दिवशी रुग्णाला सुट्टी देण्या ऐवजी त्याना व्हेंटिलेटर लावण्यात आले व बरेच दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले अनावश्यक तपासण्या वारंवार सिटी स्कॅन रोजच्या रोज महागड्या गोळ्या ओषधी या मुळे अतोनात खरचाचा भूर्दंड सहन करावा लागला लाखो रुपयांची लूट होऊनही रुग्णाला बरे करण्याची कोणतीही हमी घेण्यात आली नसल्याने महागड्या व चुकीच्या उपचार पद्धती मुळेच रुग्णाचे निधन झाले व यास जबाबदार मेडिकेयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक यांचेवर त्वरित कार्यवाही करण्यात येऊन हॉस्पिटल ची चॅरिटी मान्यता काढून घेण्यात यावी व महात्मा फुले जण आरोग्य योजनेत नाव रजिस्ट्रेशन करण्यात येऊनही लाभ दिला नसल्याने शासनाची जनअरोग्य योजना ही कायमस्वरूपी काढून घेण्यात यावी जिल्हा शल्य चिकीस्तक यवतमाळ याना वारंवार अर्ज करूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने त्यांची चोकशी करून त्वरित बदली करण्यात यावी हॉस्पिटल चे बांधकाम करिता 18ते 20 प्लॉट एकत्र करून बांधकाम करण्यात आल्याने सदरील बांधकामाची योग्य चॉकशी व्हावी पुसद ला 9/3 -9/4 लागू आहे का याची ही चॉकशी होऊन कार्यवाही व्हावी तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी चे डॉक्टर असताना प्रॉपर्टी चा व्यवसाय करणारे डॉ चिधरवार यांनी 10 वर्षात प्रॉपर्टी व्यवसायात यवतमाळ नांदेड व इतर जिल्ह्यात प्लॉट विक्री करून जमविलेल्या रकमेत उत्पनाचे स्तोत्रापेक्षा अधिक कमाई केली असल्याने ई डी मार्फत चॉकशी व्हावी तर राम मंदिराचे आरक्षण असलेल्या जमिनीवर कागदपत्रावर गडबड करून स्वतः व नातेवाईक भागीदार याचें नावे जमीन करून कोटी रुपयांचे प्लॉट विक्री केल्याने ते संपूर्ण ले आउटच रद्द करण्यात यावे व फॉजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी व मूळ मालक राममंदिर संस्थान ला सदरील जागा वापस देण्यात यावी सदरील तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ ,जिल्हा शल्यचिकित्सक यवतमाळ, ठाणेदार शहर पोलीस स्टेशन
यवतमाळ,मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ, याना पाठविल्या आहेत तर वरील प्रकारच्या सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांनी निकाली काढण्यात याव्या या करिता न्याय मिळे पर्यन्त सदरील उपोषण शासकीय वेळेत शासकीय सुट्या वगळून करण्यात येणार असल्याचे पुसद येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास कांबळे येहळेकर व संजयकुमार हनवते सवनेकर पद्माकर घायवान यांनी कळविले आहे या उपोषणाला व विविध सामाजिक संघटना ,विविध राजकीय पक्ष, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ, पदाधिकारी यांचा पाठिंबा लाभणार आहे▪️▪️▪️▪️▪️