आरेगाव येथील वृद्ध महिलेचे दागिने लुटून केला खून..

पुसद तालुक्यातील आरेगाव येथील बेलफुल वाटणारी वृद्ध महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. आज सकाळी बुधवारी अखेर तिचा ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला असून अज्ञात चोरट्याने सोण्या व चांदिचे दागीने हिसकावून घेऊन खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

पुसद पासून आठ कि.मी.अंतरावरील आरेगाव येथील यशोदाबाई कोंडबा सातव (वय ६० वर्षे)ही विधवा महिला दररोज लोणी ह्या गावात बेलफुल वाटायची. सोमवार दरम्यान भरपूर पाऊस पडत असल्याने काही काळ लोणी येथे थांबली व पावसाने उघडीप देताच आपल्या गावाकडे निघाली.परंतु दोन दिवसांपासून ही महिला घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला अखेर त्या महिलेचे प्रेत जोडरस्त्यावरील संजय चिद्दरवार यांच्या शेतात बुधवारी आढळून आले. महिलेच्या गळ्यात असलेले सोन्याची पाने, हातातील चांदीचे कडे व पाटल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून घेऊन तिचा पाय बांधला आणि खून केला असल्याचा संशय प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

तिच्या पश्चात एक विवाहीत मुलगी असून घटनास्थळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, नंदकुमार चौधरी, कुणाल रूडे, दीपक ताठे, वसंत नगरचे पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, वाहन चालक रेवन जागृत तसेच आरेगाव व लोणी येथील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. घटनेची माहिती कळताच एलसीबी तसेच तीनही पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी कर्मचारी आरोपीच्या शोध कार्यास लागली होती…