मुडाणा येथे कर्जबाजारामुळे शेतकऱ्याची आत्महत्या….

मुडाणा येथील शेतकरी रमेश शिवाजी शिन्दे वय ४८ यांनी गळफास घेवून आत्महत्या केली . सविस्तर वृत्त असे की त्यांच्यावर असलेल्या बॅकेचे कर्ज, शेतातील नापीकी व दोन मुलीची लग्न केल्यामुळे झालेली कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानी रात्री आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली सकाळी ही माहीती कळताच त्या ठीकाणी त्याचा भाऊ दिलीप शिन्दे गेला व पोलिस पाटलांच्या समवेत पो.स्टे. मध्ये तक्रार दाखल केली असता पंचनाम्याकरीता जमदार शरद येडतकर यांनी येवून पंचनामा केला व मृतदेह उत्तरस्तरनीय स्वयंच्छदनासाठी सवना येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला व मुडाणा येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर १:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला.यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली लग्न झालेल्या, व लहान दोन मुले असा आप्तपरिवार असून त्यांच्या घरातील कर्त्या माणसाने आत्महत्या केल्याने त्या लहान मुलाच्या डोक्यावरील वडीलाच छत्र हरवल आहे….