पत्रकारा वर प्राणघातक भ्यड हल्ला विश्वगामी पत्रकार संघा कडून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फ़त मुख्यमंत्री यांना निवेदन..
.पुसद :- पत्रकार संघाचे ठाणे जिल्ह्यअध्यक्ष शहबाज दिवकर यांच्यावर कसारा रेल्वे पोलिस स्टेशन परिसरातील गुंडानी प्राणघातक भ्यड हल्ला केला, तसेच सदर घटने ची फिर्याद कसारा पोलिस स्टेशनला देण्यासाठी दिवकर गेले असता त्यांची फिर्याद घेतली नाही,नेहमी प्रमाणे पोलिसांनी उड़वाउड़वी चि उतरे दिली अपमान स्पद वागणूक दिली,सदर गुंडाना गुन्हेगाराना कड़क शिक्षा होवावी,कसारा पोलिसांनी फिर्याद घेतली नाही त्या बाबत त्यांची चौकशी होउन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, राज्यात रेती माफिया व अवैध धंदे वाले यांच्या कडून पत्रकारा वर वारंवार हल्ले होत
आहेत त्यावर कड़क उपाययोजना करून करने आशा अनेक मागणी चे निवेदन सर्व महारास्ट्र भर राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघा च्या वतीने देण्यात आले यावेळी पुसद येथे ही राष्ट्रीय पत्रकार संघ पुसद च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फ़त निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पुसद तालुका अध्यक्ष एफ ए आर खान बाबा खान,,जिल्ह्य संघटक संजयकुमार हनवते,रामदास कांबळे,,तालुका उपाध्यक्ष पवन चव्हाण व इतर सहकारी पत्रकार उपस्तित होते..