महागाव काळी दौलत खान येथे विजे चा कडकडाट व धुवाधार पाऊस…
काळी दौ येथे ढगफुटी सारखा पाऊस झाला, आणि दोन विज कोसळण्याची घटना काळी दौ येथे घडली, आज दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे काळी दौ वासी भयभीत झाले. मागील दोन दिवसांपासून वातावरणात मोठी वाढ झाली होती, वातावरणात बदल झाला आणि १२.४५ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली, तब्बल एक तास संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टिी झाली, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाउस पडल्याने नागरीकांची एकच त्रेधा उडाली.तर काळी दौ येथे दोन ठिकाणी विज कोसळल्यने एक बैल जागीच ठार झाला
काळी दौ येथे साहेब मिर्झा यांच्या शेतात विज कोसळल्याने बैल ठार झाला, साहेब मिर्झा यांच्या शेतात गोपाल हा बैल चारत होता, अचानक मेघगर्जना सह पावसाला सुरुवात झाली. आणि त्यातच विज कोसळली यात एक बैल जागीच ठार झाला तर गोपाल राठोड आणि दुसरा बैल थोडक्यात बचावले,यात शेतकरी गोपाल चंदुसिंग राठोड यांचे ५० हजार रुपये किंमती चा बैल ठार झाला,तर दुसरी विज हि तांड्यातील सामकी माता मंदिराच्या घुमटावर कोसळली या मंदिर चे घुमट चे नुकसान झाले सुदैवाने जिवीत हानी झाली नाही..