◆ मराठा सेवा संघ म्हणजे पुरोगामी विचाराचे चालते बोलते विद्यापीठ-शरद मैंद कार्येकर्ता प्रशिक्षण शिबिर व गुणवंतांचा सत्कार संपन्न…..
पुसद श.प्र. -/ दि.1 नोव्हेंबर 1990 रोजी शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथील बैठकीत मराठा सेवा संघाची स्थापना केली. स्थापनेपासून पुरोगामी विचारांची बीजे रुजायला सुरवात झाली.आजमितीस मराठा सेवा संघ म्हणजे पुरोगामी विचाराचे चालते बोलते वटवृक्षरुपी विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाच्या कार्येकर्ता प्रशिक्षण शिबिर व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यातील दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष शरद मैंद सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त यांनी केले. 80च्या दशकात बहुजन समाजातील लोकांची बुद्धी खिळखिळी करण्यात अली होती,त्यावेळी समाजातील खीळखिळलेल्या बुद्धीच्या लोकांना मूळ प्रवाहात आणून जागृत करण्याचे बहुमूल्य कार्ये मराठा सेवा संघाच्या स्थापनेनंतर पुरूषोत्तम खेडेकर यांच्या माध्यमातून होऊ लागले. अभियंता या शासकीय नौकरीवर काम करणाऱ्या व्यक्तीने सेवा संघासारखी व्यापक समाज संगठना उभारणे हे फार मोठे धाडस असल्याचे सुद्धा यावेळी समारोपीय भाषणात शरद मैंद यांनी सांगितले. दि.4 सप्टेंबर रोजी हॉटेल अनुप्रभा येथील सभागृहात आयोजित शिबिरातील व्यासपीठावर अमरावती विभागाचे अपक्ष शिक्षक आ.किरण सरनाईक, प्रा.विजयराव माने, माजी जिप सदस्य साहेबराव कदम पाटील, सरपंच रवींद्र महल्ले,अनिरुद्ध पाटील चोंढीकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगम्बर जगताप सर आदी मान्यवर विराजमान होते.
आ.किरण सरनाईक यांनी मी निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा उमेदवार नव्हतो मी फक्त मराठा सेवा संघाचा उमेदवार असल्याचे त्यावेळी ही ठासून सांगायचो आणि सज सुद्धा केवळ मराठा सेवा संघाचा अपक्ष आमदार असल्याचे अभिमानाने सांगतो.त्यामुळेच आपण समाज बांधवांसाठी सदैव तत्पर असल्याचे आ.सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सेवा संघाचे प्रतिनिधी उपस्थित झाले होते. शिबिराच्या प्रथम सत्रात उदघाटक शरद मैंद,सुधिर देशमुख दिग्रस, नगरसेवक राजू साळुंखे, शिवाजीराव देशमुख, तालुकाध्यक्ष प्रभाकर टेटर,दिगम्बर जगताप सर हे व्यासपीठावर आरूढ होते.
जिजामाता यांचे प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन,दीपप्रज्वलन करून प्रथम सत्रास सुरवात झाली. यावेळी प्रथम कु.आसावरी नितीन पवार या चिमुकलीने जिजाऊ वंदनेचे उत्कृष्ट सादरींकारण केले.
शिवश्री मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून सिंदखेडराजा येथे उभारलेल्या 'जिजाऊ सृष्टीस' पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी 1 लाख 11 हजार रुपये, पुसद अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, दिग्रस यांनी तालुका समितीच्या वतीने 51 हजार रुपये,, यांनी देणगी स्वरूपात दिले. तर संतोष ठाकरे यांनी तेरविचा कार्येक्रम न करता 11 हजाराचा धनादेश जिल्हाध्यक्ष दिगम्बर जगताप सर यांना सुपूर्द केल्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने शरद मैंद, सुधिर देशमुख व संतोष ठाकरे या तिन्ही दात्यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.
सँभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्रा.प्रेमकुमार बोक्के, अमरावती यांनी दोन्ही सत्रात उपस्थितांना प्रशिक्षित केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख,जिल्हा सचिव सुरेश कदम,नितीन पवार,पंडितराव देशमुख,हरगोविंद कदम,प्रविण कदम,हरिभाऊ ठाकरे,सोनू पाटील,प्रकाश बेदरे, शिवाजी कदम,श्रीकांत देशमुख, अशोक तायडे,विजय खोडके,सुधाकर सरकचौरे,बाळासाहेब साबळे, पंजाबराव चांद्रवंशी, अजित लोंढे,अक्षय तावडे,गजानन भोगे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सौ शुभांगी पाणपट्टे,मंदा इंगोले,सुनंदा वांझळ, उजवला खंदारे,वर्षा असोले,सीमा असोले,हेमा काकडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सूत्रसंचालन यशवंतराव देशमुख सर , प्रास्ताविक सुधिर देशमुख, आभार नितीन पवार यांनी मानले.