देश
जीवन मरणाची लढाई लढणाऱ्या माकडास जीवदान…
पुसद तालुका प्रतिनिधी:——-
पी. एन. कॉलेज परिसरामधील प्रियदर्शनी मुलींचे वस्तीगृहा जवळील टेलीफोन खांबाचे तारांमध्ये माकड अडकला होता. तो आपल्या जीवन मरणाचे संघर्ष करीत जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. परंतु त्याला यश येत नव्हते.
स्थानिक वनविभागाला याबाबत सूचना देण्यात आली. वनविभागाने तातडीने घटना स्थळ गाठीत जीवन मरणाची लढाई लढत असलेल्या माकडाला सुखरूप तारांच्या जाळ्या मधून बाहेर काढून जीवनदान दिले.
वनपरिक्षेत्र कार्यालय पुसद येथील वर्तुळ अधिकारी डी.एस.ठाकरे, ए.पी. इंगोले, प्रकाश भोसले, अक्षय भुसारे, मोहन इंगळे, तानाजी दवस, सुनील राठोड आदी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माकडाला जीवनदान देण्याकामी सर्वतोपरी प्रयत्न केले.
वनपरिक्षेत्र कार्यालय पुसद येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून माकडाला जीवनदान दिल्याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे...