पुसद येथे खुनी हल्ल्याच्या घटनेत एका युवकाचा खून दोन आरोपीस अटक…
पुसद/ जुन्या भांडणाच्या कारणावरून अकरा जणांनी मिळून कट रचून खुनी हल्ल्याच्या घटनेत एकाचा खून झाल्याची घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेतील एक बालकाला ताब्यात घेण्या सोबतच एका आरोपीस अटक करण्याची कामगिरी पोलिसांनी केली आहे.
14 सप्टेंबर 2021रोजी रात्रीचे दरम्यान चे दरम्यान फिर्यादी मनोहर दिलीप श्रीरामे राहणार वेणी हा आपला मित्र मनोज किसन सवंगडे वय 21 वर्ष राहणार भीमनगर पुसद यांचे सोबत माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या बंगल्या समोरील
उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दबा धरून बसलेल्या आरोपी माधव माणिक जिरंगे वय 21 वर्ष, संघदिप संजय भगत वय 20 वर्ष, रोहन कैलास गरवारे वय 21 वर्ष, अजय ज्ञानेश्वर सावंत वय 19 वर्ष, यांच्यासोबत दोन बालकासह इतर तीन ते चार अनोळखी आरोपी त्यांनी मिळून संगनमताने जीवघेणा हल्ला करीत मुख्य आरोपी माधव चीरंगे यांनी त्याचे हातातील चाकूने मनोज सवंगडे यांचे पाठीवर चार ते पाच वार केल्याने एकच खळबळ उडाली या घटनेनंतर जखमी यास मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान मनोज सवंगडे याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मनोहर श्रीरामे यांनी दिलेल्या तक्रारी वरून शहर पोलिसांनी अकरा आरोपी विरुद्ध भादवि कलम 302, 143, 147, 148, 149, 323, 506 भा द वि अनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपासात सुरुवात केली असता यामधील अजय ज्ञानेश्वर सावंत या आरोपीस अटक करण्यासोबत सतरा वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकास सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील मृतक त्याचे विरुद्ध किडनॅपिंग व मारहाणीचे विविध गुन्हे असल्याने त्याचे विरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती सुद्धा पोलीस निरीक्षक दिनेशचन्द्र शुक्ला यांनी दिली. इतर आरोपी यांचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेचा तपास सहाय्यक
पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेशचन्द्र शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर व इंगोले तसेच पोलीस जमादार कुणाल रुडे आदि जण पुढील तपास करीत आहेत.
भर दिवसा गोळीबार करून झालेल्या हत्याकांडानंतर पंचविशीच्या आतील असलेल्या 11 युवकांनी एकत्रित येऊन खून केल्याच्या घटनेने संपूर्ण पुसद शहरात खळबळ माजली आहे. युवा वर्गाकडे सहज उपलब्ध होणारे शस्त्र व हत्यार तसेच शहरामध्ये टोळी युद्धाला वाव मिळत आहे. पुसद शहर पोलीस स्टेशन ठाणे अंतर्गत काही दिवसांपूर्वी लोणी आरे गाव येथे एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता
त्यानंतर वसंतराव नाईक चौक येथे झालेल्या युवकांच्या हाणामारीनंतर मागील आठवड्यातील लक्ष्मीनगर येथील युवकावर त्यांनी मिळून केलेला जीवघेण्या हल्ल्याची जखम वाळते न वाळते तोच काल भर दिवसा म्हणजे साडेपाच वाजता पंचविशीत या आतील युवकाच्या टोळक्यांनी हातात लाठीकाठी व चाकूने दोन दुचाकीस्वारांना वर जीवघेणा हल्ला चढविला त्यामध्ये एक जण ठारझाल्याची घटनेने सर्वत्र खळबळ माजली आणि युवकांना पालकाने व समाजाने योग्य दिशा निर्देश देत वेळेच्या आतच अशा युवकांना मार्गदर्शनाची गरज असल्याची जनभावना पुढे येत आहे. आणि या कामासाठी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ हे योग्य मार्गदर्शन करून समाजाभिमुख युवक निर्माण करू शकतात असे सुद्धा अपेक्षा दिलीप भुजबळ यांच्याकडून व्यक्त केला जात आहे….