पुसद भाजपा जेष्ठ नागरिकआघाडीने पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
दि.17पुसद:-
आज रोजी सकाळी साडेसहा वाजता आसेगावकर विद्यालय पुसद येथे पुसद भाजपा ज्येष्ठ आघाडी तर्फे योगासन शिबीर व अभिष्टचिंतन कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाचं आयोजन आमदार अॅड. निलय नाईक, विनोद जिल्हेवार, जिल्हाध्यक्ष भाजपा जेष्ठ आघाडी नागरिक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .
श्री श्री रविशंकर यांचे पट्टशिष्य रविकांत त्र्यंकटवार यांनी अभिषेक व पूजन करून पंतप्रधानाचे अभिष्टचिंतन केले.योगासन, प्राणायामाचे महत्व विशद केले. सर्वांकडून प्राणायाम कृती करून घेतली.
पुसद पतंजली योगपीठाचे प्रमुख प्रकाश वानरे , श्रीराम पद्मावार, संतोष वानखेडे, श्रीमती रेश्मा शिंदे यांनी सूर्यनमस्कार, अष्टयोगासने व प्राणायाम याचे प्रात्यक्षिक उपस्थितांकडून करून घेतले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना निरामय दीर्घायुष्य लाभून जनसेवा करण्याची संधी मिळेल अश्या शुभेच्छा देण्यात आल्यात.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आरतीताई फुफाटे उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती , विनोद जिल्हेवार, विश्वास भवरे ,श्याम भाऊ जोशी ,नारायणराव पाटील निखिल चिदरवार , धनंजय अत्रे, बंडुशेठ बियानी निळकंठ पाटील ,नंदू काळे, दीपक परिहार यांनी केली.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
, शेखर वानखेडे,अश्र्विन जयस्वाल, वर्षाताई हरणे, माधुरी वानरे, रूपालीताई जयस्वाल,सौअनितापाटील, विक्रांत जिल्हेवार ,ओमप्रकाश शिंदे, संतोष मुकेश,संतोष आर्य, गजानन चिंतावार, विजय पुरोहीत, गोविंदराव कुकडे, माधवराव भरगाडे, सुभाषराव पद्मावार, पंडित गादेवार, नंदनवार साहेब, दिपक शिंदे, पंजाब भोयर, राम बल्लाळ, भैय्या पेठकर,विजय चव्हाण,विलास चव्हाण, सुनील गि-हे, रमेश खोलघाडगे ,शुश्रुत चक्करवार , विठ्ठल पुलाते,सतिश कानडे,किशोर पानपट्टे,सुरेश तिवारी,संतोष उंटवाल ,राजु सोनुने,संदीप जिल्हेवार,इत्यादी.योग अभ्यासक उपस्थित होते.
सर्व योगाभ्यासकांना आरोग्यवर्धक काढा देण्यात आला.
“सुदिनं सुदिनं जन्मदिवस तव ,भवतु मंगलमय जन्मदिनम.”
विजयी भव सर्वत्र सर्वदा ,भवतु मंगलम जनदिनम”
या गिताने सामुहिक शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्यामभाउ जोशी सरचिटणीस भा ज पा जेष्ठ नागरिक आघाडी जिल्हा यवतमाळ तर सूत्रसंचालन शहराध्यक्ष पुसद भाजपा जेष्ठ नागरिक आघाडी मुकूंद रायपूरकर यांनी केले…