माजी जि.प.उपाध्यक्ष ययाती नाईक यांचे वाढदिवसी भव्य शस्त्र क्रिया शिबीराचे आयोजन……
पुसद तालूका प्रतिनिधी:———
ययाती नाईक मित्र मंडळ च्या वतीने ययाती नाईक यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला जात आहे.
स्माईल ट्रेन संस्था अमेरिका, श्रीराम हॉस्पिटल अकोला,ययाती नाईक मित्र मंडळ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने 20 सप्टेंबर रोजी अग्रवाल मंगल कार्यालय पुसद येथे भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करून वाढदिवस साजरा केल्या जाणार आहे.
ययाती नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये जन्मापासून दुभंगलेल्या व फाटलेल्या टाळूचे रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. डॉ. वजाहत मिर्झा हे राहणार आहेत. पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांच्या हस्ते भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. भव्य दिव्य शिबिरासाठी अकोला येथील तज्ञ डॉ. मयुर अग्रवाल हे आपले योगदान देणार आहे.
जन्मापासून दुभंगलेले बाळांचे फाटलेले ओठ यामुळे चिमुकल्यांच्या चेहर्यावर विकृती सदृश्य चेहरा दिसतोय. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये या विकृती पासून सुटकारा मिळण्याच्या दृष्टीने शिबिरामध्ये प्लास्टिक सर्जरी द्वारा योग्य ते शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. नाका-तोंडात छिद्र असल्यामुळे रुग्णांना अन्न गिळण्यास त्रास होतो. शब्द उच्चारण्यासही त्रास होतो.अशा काही निवडक रुग्णांची योग्य ती तपासणी करून त्यांना प्लास्टिक सर्जरी व शस्त्रक्रियेसाठी अकोला येथे पाठविण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये वय वर्ष 6 महिने ते 25 वर्षापर्यंतच्या रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
लहान लहान बालकांचे चेहऱ्यावरील विद्रुपता नाहीशी करून रुग्णांचे चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी ययाती नाईक मित्र मंडळाच्या वतीने यातील नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मागील सात वर्षापासून हा कार्यक्रम सतत राबविल्या जात आहे.
शिबिरामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांनी तथा त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णाचे नाव नोंदणीकरिता राधिका मेडिकल, गुरुकृपा मेडिकल, स्वस्त औषधी सेवा यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या रुग्णाला व त्याच्या सोबत एका नातेवाईकाला शस्त्रक्रियेसाठी प्रवास खर्च देण्यात येईल असेही आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.मोफत प्लास्टिक सर्जरी व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये येणाऱ्या रुग्णांची भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करता निवड झालेल्या रुग्णांना एका वर्षाकरिता संपूर्ण औषधे मोफत देण्यात येणार असल्याचेही नाईक मित्र मंडळ यांच्या वतीने कळविण्यात आले आहे….