पुसद …..ॲट्रॉसिटी गुन्हा नोंदवून घेण्यास ग्रामीण पोलिसांची टाळाटाळ…
पुसद प्रतिनिधी:-
ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरा ( ई) येथील तंटामुक्ती अध्यक्ष मारोती आगोसे यांना गावातीलच एकाने तू डीजे चा आवाज कमी करण्यावरून पोलिसांना फोन का केला या कारणावरून तंटामुक्ती अध्यक्ष मारोती आगोसे यांच्या घरी जाऊन शिविगाळ करीत गालात दोन थापडा लगावल्या याची तकरार पोलिसांत करूनही ठाणेदार मोतीराम बोडखे यांनी आरोपीची पाठराखन करीत किरकोळ गुन्हे दाखल करुन आरोपीची पाठराखण केली.
धानोरा ई येथील तंटामुक्ती अध्यक्षावर जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या व्याक्तीस ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके व बिट जमादार दिपक रुडे हे काही चिरीमिरी घेऊन पाठीशी घालत असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल करण्यात आली असून गैरअर्जदारवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत असल्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत तंटामुक्ती अध्यक्ष मारोती अगोशे यांनी केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,दि.१०सप्टेंबर२०२१ रोजी गणेश स्थापनेच्या दिवशी पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या धानोरा ईजारा येथे एका फोनवरील वादाच्या मध्यस्थीमध्ये भाग घेणे तंटामुक्ती अध्यक्षाचे जीवावर बेतले. गावातील गैरअर्जदार अंकुश हनुमान हाके हे डी.जे.चा साऊंड मोठ्याने वाजवीत असल्याने गावातील नागरिकांना त्या आवाजाचा त्रास होऊ लागला.त्यामुळे स्थानिक किराणा दुकानदार कैलास हाके यांनी तंटामुक्ती अध्यक्षाचे घर गाठले व तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहात या डीजेचे आवाजाने आम्हाला काहीच ऐकू येत नाही ग्राहक दुकानात काय सामान मागत आहेत तेही कळत नाही त्यामुळे तुम्ही डीजेवाल्याला आवाज कमी.
करण्यास समजून सांगा.. किंवा पोलीस स्टेशनला कळवा परंतु
तंटामुक्ती अध्यक्षांनी किराणा दुकानदारांना सांगितले ते माझे ऐकत नाही तूच पोलीस स्टेशनला स्वतः फोन कर.त्यावेळी किराणा दुकानदारांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला संपर्क साधला व माहिती दिली. पंरतु गैरअर्जदाराने डीजेच्या आवाजाचा उन्माद माजवला होता. त्यावेळेस गैरअर्जदाराला डिजेच्या आवाजा बाबत पोलीस स्टेशनला माहिती दिल्याची घटना कळताच त्यांनी थेट तंटामुक्ती अध्यक्ष मारोती अगोशे यांच्या घरी जाऊन पोलिसांना का फोन केला असे सांगून जातीवाचक शिवीगाळ करीत थापड लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तेवढ्यात पोलिसांची गाडी गावात आल्याने हि घडलेली घटना तंटामुक्ती अध्यक्षांनी बीट जमदार दिपक रुडे यांना सांगितली त्यावर बिट जमादार यांनी तंटामुक्ती अध्यक्ष मारोती अगोशे यांना पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदविण्यास सांगितले.
त्यावेळेस रात्री १०:०० ते ११:०० वाजण्याच्या सुमारास तंटामुक्ती अध्यक्ष मारोती आगोसे यांनी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून गैरअर्जदार विरोधात फिर्याद नोंदविताना आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची जबानी माहिती पोलिसांना दिली तरीही उलट पोलिसांनी आरोपीवरअदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
विशेष म्हणजे सदर घटना दि. १० सप्टेंबर२०२१ ची असून पोलिसांनी अदाखलपात्र गुन्हा दि. १४ सप्टेंबर २०२१रोजी नोंदवला आहे.
त्यामुळे पोलीसच गैरअर्जदाराला पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप तंटामुक्ती अध्यक्ष मारोती अगोशे यांनी दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात नमूद केला आहे. त्यामुळे सदर आरोपी गुंड प्रवृत्तीचा असुनही ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके व बीट जमदार दिपक रुडे यांनी चिरीमिरी घेऊन या आरोपींला संगणमत करून पाठीशी घालत असल्याचा पत्रकार परिषद मध्ये खळबळजनक आरोप केला आहे.आरोपीला दम देण्याऐवजी तक्रारदाराला दम देण्यात येत असून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या पोलीसांकडुन दिल्या जात असल्याचा आरोपही पोलिसांवर करण्यात आला आहे.
त्यामुळे या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून आरोपी अंकुश हनुमान हाके यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तंटामुक्ती अध्यक्ष मारोती अगोशे यांनी केली आहे.
जर पोलीस प्रशासनाच्या काळात तंटामुक्ती अध्यक्षच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकाचे काय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे…