पुसद माणिकडोह येथे महात्मा मुंगसाजी शाळेत लसीकरणला सुरुवात….
पुसद:प्रतिनिधी:
दि 11 जाने 2022 रोजी मु़ंगसाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा माणिकडोह तालुका पुसद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबाळपिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये COVID 19 लसीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये वर्ग 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना लस देण्यात आली या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितिन पुलाते हे होते तर प्रमुख पाहुणे ए.एम.पातुरकर ,(मंडळ अधिकारी तहसिल कार्यालय पुसद) व निकम ( तलाठी माणिकडोह) हे होते डॉक्टर नितीन पुलाते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत शाळेचे प्राचार्य मंदाडे यांनी केले तर पातुरकर व निकम साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत ढगे ( प्राथमिक मुख्याध्यापक) यांनी केले यानंतर डॉक्टर नितीन पुलाते यांनी लसीकरणाविषयी विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षकांना माहिती दिली व त्याचा फायदा कसा होतो.हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वाघ यांनी केले. त्यानंतर वर्ग 9 ते 12 मधील उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबाळ पिंपरी अंतर्गत श्रीमती राठोड सिस्टर श्रीमती चव्हाण सिस्टर यांनी लस दिल्या व त्यांना डाखोरे, श्रीरामे व रोकडे (आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबाळपिपरी)यांनी मदत केली लस देण्याचा संपूर्ण कार्यक्रम डॉक्टर नितीन पुलाते ,प्राचार्य अनिल मंदाडे व प्राथमिक मुख्याध्यापक ढगे यांच्या निगराणीखाली व्यवस्थित पार पडला. लसीकरणाच्या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले…