माणुसकीची भिंत पुसद येथे सुभाष चंद्र बोस व हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त अन्नदान…..
दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना शहर प्रमुख संतोष धरणे पाटील माजी तालुका प्रमुख विकास जामकर व उप शहर प्रमुख विजय बाबर व सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकज पाल महाराज यांच्या हस्ते पूजन करून शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले सुभाष चंद्र बोस हे भारतातील स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते ते नेताजी या नावाने ओळखले जातात दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्या सुभाचन्द्र बोस यांचे स्थान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खूप महत्त्वाचे मानले जाते तसेच हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य जिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे रुग्ण त्यांचे नातेवाईक व पुसद मधील बेघर गरजूंना पोळी भाजी भात जिलेबीचे जेवण देण्यात आले व मोठ्या उत्साहात सुभाष चंद्र बोस व रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकज पाल महाराज यांनी पुसद मधील जनतेला माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे अन्नदानाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळेस उपस्थित प्रमुख पाहुणे शिवसेना पुसद शहर चे विकास जामकर विजय बाबर संतोष दरणे राजूभाऊ महाजन अर्जुन कुमार राठोड रवी बहादुरे दिनेश गवळी अवि बहादुरे निखील दशरथे अंकुश खरात व माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन अध्यक्ष गजानन जाधव सचिव जगत रावल सदस्य पंकजपाल महाराज जगदीश रावल आदित्य जाधव व रुग्णांचे नातेवाईक इतर मान्यवर उपस्थित होते..