पुसद मध्ये “सदभावना मंच “च्या माध्यमातून सामाजिक एकोपा जपण्याचा नवा अध्याय सुरू होणार….

◆समाजातील सर्व घटकांच्या बैठकीत निर्णय
◆समन्वयक म्हणून शरद मैंद यांची एकमताने निवड
पुसद ता.प्र.-/ मागील काही वर्षात पुसद उपविभागात दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याच्या लागोपाठ घटना घडत आहेत.या घटनांवर आवर घालून त्या होऊच नये या साठी उपाययोजना करण्यासाठी समिती गठीत करण्याचा विचार पुढे आला होता.त्यानुसार काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील पुसद अर्बन बँकेच्या सभागृहात शहरातील सर्वच घटकांचा समावेश असलेली सभा संपन्न झाली.या सभेत “सदभावना मंच ” ची स्थापना करण्यात येऊन मंचच्या माध्यमातून तालुक्यातील सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शरद मैंद तसेच आमदार इंद्रनील नाईक व आमदार डॉ वजाहत मिर्झा यांची विशेष उपस्थिती होती. प्रा सुरेश गोफणे,राजन मुखरे,डॉ मोहम्मद नदीम,सुरज डुबेवार,विनोद जिल्हेवार, डॉ पंकज जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सदभावना मंच च्या कार्यपद्धती बाबत सुझाव देण्याचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले त्यात सुरज डुबेवार,भीमराव कांबळे,प्रा.संजय चव्हाण, आत्माराम जाधव,निशांत बयास, खान मोहम्मद खान,सुशांत महल्ले,रवी पद्मावार,विनोद जिल्हेवार, प्रा सलमान सैय्यद, सै युनूस बुखारी,ताहेरखान पठाण,रुपेंद्र अग्रवाल,स्वप्नील चिंतामणी, ललित सेता,एड उमाकांत पापीनवार, डॉ मोहम्मद नदीम, प्रा सुरेश गोफणे यांनी एकोपा राखण्यासाठी आवश्यक अनेक मुद्यांवर सुचना मांडल्या.त्यानंतर डॉ मोहम्मद नदीम यांनी सदभावना मंच च्या समन्वयक पदासाठी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे नाव सुचविले त्यास सभेने टाळ्या वाजवून एकमताने समर्थन केले.यावेळी बोलतांना शरद मैंद यांनी तणावपूर्ण घटनेचा व्यापार व शैक्षणिक संस्थांना सर्वात मोठा फटका बसतो त्यामुळे कोणत्याही पक्ष, संघटना, समाजाने बंद पुकारू नये व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करू नये असे आवाहन करून ज्यांनी ज्या सुचना मांडल्या त्याबाबत सदभावना मंच सकारात्मक विचार करेल असे सांगितले. डॉ वजाहत मिर्झा यांनी या प्रयत्नाचे स्वागत करून तालुक्यातील संवेदनशील गावातील लोकांना सहभागी करून घेण्याची सूचना मांडली. आमदार इंद्रनील नाईक यांनी देखील सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थापीत सदभावना मंच ला प्रशासकीय स्तरावर काय सहकार्य करता येईल यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेशी प्राधान्याने चर्चा करणार असल्याचे सांगितले. संचालन डॉ मोहम्मद नदीम तर आभार प्रदर्शन ललीत सेता यांनी केले.यावेळी शहरातील विविध राजकीय पक्ष, पुसद चेंबर ऑफ कॉमर्स,सामाजिक , वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी पंजाबराव खडकेकर,अनिरुद्ध पाटील,महेश खडसे,विजय जाधव, प्रचार्य डॉ गणेश ठेंगे पाटील,डॉ अमोल मालपाणी,भारत पेन्शनवार, ऍड.उमाकांत पापीनवार, प्रवीर व्यवहारे,शरद पाटील,रवी पदमवार, रवी ग्यानचांदाणी,सुशांत महाले, नारायण क्षिरसागर,संजय बजाज,शेख आझाद,निखिल चिदरवार,डॉ पंकज जयस्वाल, राजू साळुंखे,ताहेर खान पठाण,हरीश चौधरी,अशोक वडते, संगमनाथ सोमावर, प्रकाश भोसले, संजय करमणकर,तुषार सेता, विठलं खड्से, अनिल चव्हाण (पाटील), संतोष अग्रवाल, नाना बेले, प्रविण कदम, निशांत बयास, सैय्यद ईश्त्याक,आत्माराम जाधव, रंजित सांबरे,भारत पाटील,दिगम्बर जगताप,कौस्तुभ धुमाळे,प्रा.संजय चव्हाण, अर्जुन बेलखेडे,प्रभाकर टेटर,लक्ष्मीकांत उपलेंचवार,अनिल डुबेवार,अंकुश भलगे, खान मोहंमद खान सनी, समीर गवळी,अशोक बाबर,रमेश लोंढे, लल्ला दिंडे सचिन हराळ,महेश रावल, प्रितम अलगे,गजानन व्यवहारे, शेख शाकिर,सैय्यद बिलाल,तेहसीन खान,अनिकेत पाटील, प्रमोद पंडितकर, भीमराव कांबळे, डॉ गजानन भोपी, गणेश डांगोरिया, अलियार खान,राहुल कांबळे, धनंजय अत्रे,विश्वास भवरे,भारत डांगर, चंद्रकांत डांगर,गणेश देशमुख, उद्धव पांढरे,अभिषेक पवार,संदीप बलखंडे, अभिमन्यू शिंदे,अतिकोद्दिन खतीब,हरगोविंद कदम,शिवाजी कदम,श्याम सावळे,अमोल व्हडगिरे, भारत जाधव,अभिजीत पानपट्टे,सुनील टाक, संजय पवार इत्यादींची उपस्थिती होती…