राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर यांच्या वाढदिवसा निमित्त शासकीय… अधिकाऱ्यांना वृक्ष भेट देऊन केला वाढदिवस साजरा….
यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष रामदास कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वाढदिवस साजरा करण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता पूजा पुजारी मॅडम तसेच उपविभागीय अभियंता प्रकाश शेळके साहेब यांना वृक्ष भेट दिले. जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता वीरेंद्र शिरसागर पुसद यांनासुद्धा वृक्ष भेट दिले शाखा अभियंता चव्हाण साहेब सुरज बिरबल साहेब शाखा अभियंता ठाकरे साहेब, याप्रसंगी कार्यकारी अभियंता पूजा पुजारी मॅडम सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद उपस्थित होते माननीय संतोष निकम सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले मानवाच्या जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा यांची महत्त्वपूर्ण गरज आहे तसेच मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा गरज आहे.
वृक्ष भेट देऊन एक चांगला उपक्रमआपण राबवित आहात असेच उपक्रम राबविण्यात यावे अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष राजू सोनुने, जिल्हा कार्याध्यक्ष किरण मुक्कावार, जिल्हा संघटक सय्यद मुजोबोदिन, पुसद तालुका अध्यक्ष अनिल पाटील चव्हाण, पुसद तालुका सचिव बाबुराव ढगे, पुसद तालुका उपाध्यक्ष सय्यद फेजान , पुसद तालुका संघटक प्रकाश खिल्लारे, पुसद तालुका सल्लागार नरेंद्र खंदारे, प्रसिद्धीप्रमुख पवन पाटील चव्हाण आदी पदाधिकारी व संघातील सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते…