छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी…

पुसद तालुका प्रतिनिधी:——-
छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती ईटावा वार्ड पुसद यांचे वतीने
स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची 367 वी जयंती इटावा वार्ड पुसद येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम जिजाऊ वंदना परिसरातील महिलांच्या उपस्थितीत कु. अंजली काळे यांनी म्हटली. उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते तसेच महिलांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुधीर भाऊ देशमुख, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष जगताप सर,एडवोकेट भारत जाधव, मेडिकेअर हॉस्पिटलचे सी.ओ. डॉ. सतीश चिद्दरवार. मराठा सेवा संघाचे माजी तालुका अध्यक्ष बेंद्रे सर,रावजी फिटनेसचे मालक वैभव भाऊ फुके यांचे सह इटावा येथील महिला ब्रिगेड व छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिणाऱ्या प्रगाढ पंडित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवामध्ये ईटावा परिसरातील अबाल वृद्ध नागरिक महिला मुलींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवून आपल्या राजाला मानवंदना दिली..