चोरी घरफोडी मधील आरोपीस 24 तासाचे आत जेरबंद केले…
पुसद प्रतिनिधी
पुसद शहरातील शिवाजी वार्ड पुसद येथे राहणारे फिर्यादी नामे सौ.किरण प्रफुल भालेराव,वय-29 वर्षे हया दि.12/05/2023 रोजी रात्री 11.30 वा. त्यांचे राहते घरी त्यांचे छोटया मुलीसह झोपलेल्या असतांना, अंदाजे 02.45 वा. सुमारास कोणीतरी अनोळखी चोरटा त्यांचे गळयातील सोन्याचे शॉर्ट गंठण कट करत असल्याचे जाणवल्याने त्यांना जाग आली. तेंव्हा त्यांनी बघीतले असता एक अनोळखी चोरटा दिसला, त्यांनी आरडा – ओरडा केल्याने सदर चोरटा उडी मारुन पळुन गेला. त्यांचे गळयातील सोन्याचे शॉर्ट गंठण 11 ग्रॅम वजनाचे किंमत अंदाजे- 40000/- रुपयाचे तसेच घरात टी पॉयवर ठेवुन असलेला रेडमी कंपनीचा मोबाईल कि.अं.5000/- रुपयाचा असा मुद्देमाल सदर चोराने घरात घुसुन चोरुन नेले. तसेच त्याच दरम्यान त्यांचे शेजारी राहणारे गणेश ढेरे यांचे घरी सुध्दा चोरी होवुन एक आयटेल कंपनीचा मोबाईल कि.अं.2000/- रुपये व 500/- रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे फिर्यादी यांना समजले. फिर्यादी सौ.किरण भालेराव यांनी दि.13/05/2023 रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे रिपोर्ट दिल्याने सदर प्रकरणी अप.क्र.332/23,कलम-457,380 भा.दं.वि. गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन पथकातील स.पो.नि. प्रेमकुमार केदार, पो.उप.नि. शरद लोहकरे व पोलीस अंमलदार यांना तपासाबाबत सुचना दिल्या. तपास अधिकारी स.पो.नि. प्रेमकुमार केदार, पो.उप.नि. शरद लोहकरे यांनी तपासाचे चक्र फिरवीले व घटना घडलेल्या भागातील सि.सि.टी.व्ही.कॅमेरे तपासले असता एक संशईत ईसम त्यांना आढळुन आला. फिर्यादी यांना सि.सि.टी.व्ही. फुटेज दाखवुन विचारपूस केली असता, सदर ईसम यानेच चोरी केल्याचे खात्रीपुर्वक सांगीतले. त्यावरुन गुन्हयात चोरी गेलेल्या मोबाईलची माहिती घेतली असता, एक मोबाईल चालु असल्याचे समजुन आले व सदर मोबाईल हा हार्दडा, ता.उमरखेड परीसरात असल्याचे निदर्शनास आल्याने, तात्काळ लोकेशन दाखवीलेल्या परिसरात जावुन रुट सेल आयडी या मोबाईल ऍप्लीकेशन द्वारे तांत्रीक साधनाच्या साहाय्याने 5-6 किलोमीटर चा परीसर पिंजुन काढला व त्याचे संभाव्य ठिकाण निश्चीत करुन, तेथे संशईताचा शोध घेतला असता, एका शेतातील बंद घराजवळ सदर ईसम लपुन बसलेला आढळला. सदर संशईत ईसम यास ताब्यात घेण्यात आले त्याचेकडे गुन्हयातील एक मोबाईल मिळुन आल्याने त्यास सदर मोबाईलबाबत त्याने असमाधानकारक व उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यास पोलीस स्टेशन पुसद शहर येथे आणुन दि.13/05/2023 रोजीच अटक करण्यात आली आहे. गुन्हा घडल्यापासुन 24 तासाचे आत अनोळखी आरोपी निष्पन्न करुन आरोपीस अटक करुन त्याचेकडुन फिर्यादी यांचे घरातुन चोरलेला एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचेकडे अधिक तपास करुन लवकरच गुन्हयातील ईतर मुद्देमाल सुध्दा जप्त करण्यात येईल असा विश्वास तपास अधिकारी यांनी दिला आहे. सदर गुन्ह्याचा पुढिल तपास स.पो.नि. प्रेमकुमार केदार हे करत आहेत.
अर्जुन उत्तम कनकापुरे वय २६ वर्षे रा.ब्राम्हणगाव ता.उमरखेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर गुन्हयाचा तपास डॉ.पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, पंकज अतुलकर सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय अधिकारी पुसद, शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक पो.स्टे.पुसद शहर यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रेमकुमार केदार, पोलीस उप.निरीक्षक शरद लोहकरे, पो.हे.कॉ.प्रफुल ईंगोले,पो.ना. विवेकानंद सुर्यवंशी, पो.ना. दिनेश सोळंके, पो.कॉ. शुध्दोधन भगत, पो.कॉ. वैजनाथ पवार,पो.कॉ. आकाश बाभुळकर यांनी केला..