बोगस बियाणे व भेसळयुक्त खते पुरविणाऱ्या कंपन्यांची गय नाही– वासुदेव काळे
पुसद– बोगस बियाणे व भेसळयुक्त खते यामुळे शेतकऱ्यांना मोठया संकटांना तोंड द्यावे लागते,आशा बोगस बियाणे व भेसळ युक्त खते पुरविणाऱ्या कंपन्यांची यापुढे गय केली जाणार नाही.केंद्रांत व राज्यात भाजपा सरकार असून आशा कंपन्यांवर कठोर कार्यवाही करण्याची जवाबदारी किसान मोर्चाने स्वीकारली असून,ही किड समूळ नष्ट करण्यास किसान मोर्चा कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी केलेआहे.ते पुसद येथे संपन्न झालेल्या पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आपल्या समारोपीय भाषणात बोलत होते. किसान मोर्चाचे कार्यकर्ते राज्यातील प्रत्येक शेतकऱ्या पर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतील.शेतकऱ्यांकडून आलेला फीडबॅक आमच्यासाठी महत्त्वाचा असून त्यावर उपाययोजना करण्याला अमाचे प्राधान्य राहील.यावेळी त्यांनी राज्य सरकारने वार्षिक ६०००₹ अधिक मागास जील्ह्याकरिताचे ९०००₹ सन्मान निधी सुरू केल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले.
पश्चिम विदर्भातील किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन किसान मोर्चाचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख महेश नाईक यांनी पुसद येथे केले होते.बैठकीची सुरुवात स्व.दीनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. वासुदेव काळे यांच्या हस्ते यावेळी द्वीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री मकरंद कोरडे यांनी पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांकडून संघटात्मक अढावा घेतला. त्यांनी शेतकरी संपर्क महाभियानाची रचना समजाऊन सांगून,एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आपण तयार राहावे असे आव्हान पदाधिकाऱ्यांना केले.आता किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना स्वस्थ बसता येणार नाही,काम न करणाऱ्यांनी पदे अडून ठेवू नये असा सज्जड दम ही त्यांनी पदाधिकऱ्यांना भरला. यावेळी ओबीसी मोर्चाचे प.विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र डांगे, प्रदेश उपाध्यक्ष अमर दिनकर, अभियानाचे प.विदर्भ संयोजक ललित समदुरकर, प्रदेश सचिव अजय दुबे, प्रदेश सदस्य चंद्रकांत मुंगिन वार , जिल्हाध्यक्ष माधवराव माने यांनी आपले मत मांडले,तर प.विदर्भ संपर्क प्रमुख महेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन तालुका अध्यक्ष ओमप्रकाश शिंदे यांनी तर आभार प्रदेश सदस्य विनोद जाधव यांनी केले.यावेळी जिल्हा सरचिटणीस विश्वजित सरनाईक,संजय लोंढे,विजय पुरोहित,संजय पांडे,देवराव दीवसे,नारायण पुलाते,रमेश पंडित,संजय ठाकरे,गजानन हिंगमिरे,अमृतराव देशमुख, महीला आघाडीच्या कल्पना वाघमारे, वर्षा जाधव,नीतू चव्हाण,सुरेखा बेद्रे सह पश्चिम विदर्भातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते..