संभाजी ब्रिगेड पुसद तालुका अध्यक्षपदी करण पानपट्टे तर शहराध्यक्ष म्हणून सुमीत वानखेडे यांची नियुक्ती..!
दि.१६/५/२३ रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे व प्रदेश संघटक प्रा.प्रेमकुमार बोके यांचे पुसद भेटीमध्ये संभाजी ब्रिगेड पुसद तालुका पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली.
शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचा जागर करून महाराष्ट्रात सामाजिक,धार्मिक ऐक्य जपून न्याय,समता,बंधुता या विचारावर चालणारे संघटीत पक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेड..
तरुणाच्या हातात पुस्तक देऊन मन,मेंदू,सशक्त करणारा व तरुणांना खरे प्रखर राष्ट्रप्रेम व देशभक्ती सांगून हातात दगड न देता विचार देणारा सशक्त संघटीत पक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेड.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख व नितीन पवार ,गणेश पावडे यांचे मार्गदर्शनात करण प्रदीप पानपट्टे यांची पुसद तालुका अध्यक्षपदी तर सुमीत सुशील वानखेडे याची पुसद शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी दिगंबर जगताप जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ,यवतमाळ यांच्या उपस्थितीसह
पुसदच्या विश्रामगृहावर पार पडलेल्या या कार्यक्रमास खलील मान्यवर उपस्थित होते प्रकाश बेद्रे, गणेश पावडे, ज्ञानदेव बांडे, शिवाजी कदम, हरिभाऊ ठाकरे, श्रीमती मंदा इंगोले अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, सौ शुभांगीताई पानपट्टे, सौ सुनंदाताई वांझाळ, सौ नीला गुघाणे,प्रभास पाटील, सचिन सुरोशे, अनिकेत पाटील, ऋषिकेश मुळे, सम्राट कोरडे, वैभव पवार, माधव पानपट्टे, अंकित पुसदेकर, निरंजन अंभोरे, अक्षय जाधव, वैभव शिंदे, सतीश फुटानकर व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्तिथीत निवडी संपन्न झाल्यात…