वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे मार्गांच्या कामांना गती देण्यात यावी…
खासदार.भावना गवळी (पाटील)
वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित रेल्वे मार्गाचे होत असलेल्या कामांना गती देण्यात यावी तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी या विभागाच्या खासदार भावनाताई गवळी (पाटील) यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
नवी दिल्ली येथे 26 जून रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी कुमार वैष्णव जी यांची भेट घेऊन यवतमाळ-वाशिम मतदार संघातील रेल्वेच्या विविध विकास कामाबाबत चर्चा केली. विशेषतः वर्धा,यवतमाळ, नांदेड रेल्वे मार्गाच्या कार्यामध्ये गती आणून हे कार्य तातडीने पूर्ण करण्यात यावे, तसेच देवलाली ते यवतमाळ नवीन या रेल्वे ट्रैकची चाचणी घेण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे.
यवतमाळ ते मूर्तिजापूर शकुंतला रेल्वे- ब्रोडगेजच्या कामाला गती देण्यात यावी. तसेच वाशिम येथून मुंबई अणि पुणे करीता जाणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात.आदी विविध प्रकारच्या मागण्यांची केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करीत मागणी केली आहे.
वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गावरील संथ गतीने होणारे काम जलद गतीने होण्याच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वेमंत्री यांना गळ घालित त्यांनी लवकरात लवकर या मार्गाची काम पूर्णत्वाकडे नेण्याचे दृष्टीने सहकार्य करावे अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे.
वाशिमहून थेट पंढरपूर जाण्याकरिता वारकरी भक्तांना आषाढी स्पेशल ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार पण वक्त केले. खासदार भावनाताई गवळी (पाटील) यांनी वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाच्या जलद गतीने काम होण्याच्या दृष्टीने केलेल्या मागणीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे..