विदर्भाची पंढरी पुसद नगरी आषाढी एकादशीचे भव्य आयोजन…
विदर्भाची पंढरी म्हणून सुपरिचित पुसद नगरीमध्ये आषाढी एकादशीची निमित्य विठुरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पुसद येथील प्रसिद्ध वारकरी संप्रदायाचे दैवत विठुरायाचे मंदिर श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद येथे 29 जून 2023 गुरुवार रोजी आषाढी एकादशी निमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेमध्ये 1350 सेवा धारी तर त्यांचा मोठा सहभाग राहणार आहे या भव्य दिव्य ऐतिहासिक आषाढी एकादशीच्या यात्रेचे भव्य आयोजनासाठी मंदिर कार्यकारणी तसेच मंदिर नियोजन समितीचे सहकार्याने विठुरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची फक्त एकच रांग मार्ग असणार आहे तो मार्ग गुजरी चौकातील मंडपाचा प्रवेशदरातून ठेवण्यात आलेला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने बस स्टॅन्ड ते गुजरी चौक गुजरी चौक ते बस स्टँड भाविकांना मोफत ने आन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दोन चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था संतोषी माता मंदिर परिसर बालाजी मंदिर परिषद मेंढ्या मारुती सभोवतालचा परिसर मारुती कन्या शाळेचे पटांगण गोल्ड प्लाझा सुभाष टॉकीज ची जागा सराफा लाईन आधी ठिकाणी करण्यात आलेली आहे चार चाकी वाहनांची व्यवस्था जुना सरकारी दवाखाना या ठिकाणी करण्यात आलेली आहे दिव्यांग भाविकांना व्हीलचेअरवर वर बसून तसेच वयोवृत्त भाविकांना विठुरायाच्या थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे भाविकांना आपल्या पादत्राणे ठेवण्यासाठी भव्य मोफत चप्पल स्टॅन्ड गुजरी चौक मध्ये एकाच ठिकाणी ठेवण्यात आले आहे भाविकांना बारी मध्ये प्रवेश केल्यावर पाय धुण्याची व्यवस्था तसेच पुरुष मंडळींना गंध व बुक्का तर स्त्रियांना हळद कुंकवाचे स्वागत करण्यात येणार आहे येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिर प्रशासनातर्फे फराळ व चहा पानाचे आयोजन करण्यात आले आहे मंदिर व सभोवतालच्या परिसरामध्ये भव्य वॉटरप्रूफ मंडप त्यामध्ये विद्युत पंखे विद्युत सजावट विद्युत लाईटची व्यवस्था करण्याची व्यवस्था गुप्त कॅमेऱ्याची सीसीटीव्ही यंत्रणा बारी मध्ये ठेवण्यात आलेली आहे.29 जून 2023 रोजी सकाळी चार वाजता विठुरायाला पंचामृताने अभिषेक करण्यात येणार आहे सकाळी सहा वाजता महाआरती साडेसात वाजता ज्ञानेश्वरीचे सामान सामूहिक पारायण सकाळी साडे आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत विठुरायाचे भजन व भक्ती गीत माला सायंकाळी आठ वाजता हरिपाठ व रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत हरी किर्तन ठेवण्यात आलेले आहे भाविकांनी या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे..