त्या शिक्षकावर बलात्कार सहित, पोक्सो व विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल…
पुसद प्रतिनिधी
वसंत नगर पोलीस स्टेशन येथे
दिनांक 23 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या, दरम्यान आदित्य उर्फ मंगेश वाठोरे यांच्यावर बलात्कारासहित पॉक्सो व विविध भा.द.वी. अन्वे गुन्हे दाखल करण्यात आले
असून आरोपीला पोलिसांनी एकच तासात अटक करून
न्यायालयात हजर केले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद शहरातील शाळेतील एका शिक्षकाने कोविड काळात व्हाट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देण्याचा फायदा घेऊन एका अल्पवयीन मुली सोबत जवळीक साधून जवळपास 2 वर्ष लैंगिक अत्याचार केले.सदर शिक्षक वारंवार त्रास देत असल्याने घडलेलि सर्व आपबीती घटना
त्या मुलींनीआपल्या आई-वडिलांना सांगितले.
आई-वडिलांनी लगेच वसंत नगर पोलीस स्टेशन गाठून त्या अत्याचारी शिक्षका विरोधात तक्रार देण्यात आली.
सदर घटनेचे गांभीर्य बघून वसंत नगर पोलीस स्टेशन येथे गंभीर गुन्हे दाखल करून पोलिसांनी। आरोपीस अटक करून विद्यमान
न्यायालया समोर हजर केले असता सदर आरोपीस 27 जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे..