देसी पिस्टल सह मध्यप्रदेशातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात….
पुसद तालुका प्रतिनिधी:——-
पुसद शहर पोलीस स्टेशन डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डीबी पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून खात्री लायक माहिती मिळाल्यावरून त्यांनी पुसद ते माहूर रोड वर माहूर फाटा येथे एक व्यक्ती अवैद्य देशी पिस्टल विक्री करण्याचे उद्देशाने उभा आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्या व्यक्तीस ताब्यात घेतले.
आपल्या खास मूकबिराकडून गोपनीय माहिती मिळताच डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांनी पोलीस स्टेशन पुसद शहरचे ठाणेदार पांचाळ यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक पांचाळ यांनी सुचित केलेल्या मार्गदर्शनानुसार सापळा रचून आरोपीस जेरबंद केले.
आरोपी सनी उर्फ अभिषेक अर्जुन आर्य वय २४ वर्ष राहणार सडक मोहल्ला चिंचोली जिल्हा बैतूल याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेमध्ये लपवून ठेवलेली देशी बनावटीची पिस्टल मॅगझीन अंदाजे किंमत ३० हजार रुपये मिळून आली. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार प्रफुल इंगोले यांनी दिली आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अपराध क्रमांक ४३७/ २०२३ कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब,सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांचाळ साहेब यांच्या सूचनेनुसार डीबी पथक प्रमुख शरद लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक दिनकर दमकोंडवार, पोलीस हवालदार प्रफुल इंगोले, पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाभुळकर, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत यांनी कार्यवाही केली पुढील तपास पोलीस स्टेशन पुसद शहर करीत आहे.