घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम देण्यासाठी मुख्याधिकाऱ्याला निवेदन.. शिवसेनेकडून १५ दिवसाचा अल्टिमेटम…
प्रतिनिधी ।पुसद
नगरपालिकेच्या हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाली आहे.घरकुल मंजूर होताच टप्प्याटप्प्याने निधी देखील मिळाला आहे.परंतु उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना आजपर्यंत मिळाली नाही. उर्वरित रक्कम देण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याकडे दि.३० जून २०२३ रोजी शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे.
पुसद शहरातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या ध्येय धोरणानुसार सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांमध्ये घरकुल बांधकाम करण्याची परवानगी मिळाली होती.त्यानुसार लाभार्थ्यांनी त्यांच्या घरकुल बांधकामाकरिता मंजूर झालेले पूर्ण रक्कम बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देण्यात आलेली नाही.घरकुल लाभार्थ्यांना त्यांची उर्वरित शिल्लक रक्कम विना विलंब त्वरित देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम न मिळाल्यास शिवसेनेकडून शांततेच्या मार्गाने जन आंदोलन करावे लागेल असे निवेदनातून खडसावले आहे.त्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी १५ दिवसाच्या आत घरकुल लाभार्थ्यांना त्यांची उर्वरित रक्कम देण्याची मागणी केली आहे.नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे तालुका प्रमुख संजयसींग बयास,शहर प्रमुख दीपक उखळकर,शहर संघटक अनिल चव्हाण (पाटील),सिद्धांत कोल्हे, विश्वास मुजमुले,सोपीनाथ माने, प्रकाश सहातोंडे,सुभाष बाबर, यांच्या सह्या आहेत..