छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर भावी पिढीला प्रेरणादायी : डॉ.आनंद मुखरे…

शिवसामान्यज्ञान परीक्षा: १२७२१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा..
पुसद दिनांक ४ फेब्रुवारी २४
छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास बालवयात अभ्यासल्याने भावी जीवनात प्रेरक ठरणार आहे. विचारांचा जागर शिव सामान्य ज्ञान परीक्षा निमित्ताने होतआहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ आनंद मुखरे यांनी केले.
सुट्टीचा दिवस असूनही शहरातील सर्व शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या होत्या. छत्रपतींचे विचार डोक्यात घेऊन तब्बल १२७२१ विद्यार्थ्यांनी शिवसामान्य परीक्षा दिली आहे. रविवारी आयोजित परीक्षेसाठी ३८ केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती.
परीक्षेचा उद्घाटन सोहळा येथील मातृशाळा कोषटवार दौलतखान विद्यालय व गो. मु. कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ आनंद मुखरे होते. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे मुख्य मार्गदर्शक तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, मराठा सेवा संघाचे जेष्ठ नेते दिगंबरराव जगताप प्रमुख अतिथी होते.
यावेळी परीक्षेच्या यशस्वी आणि पारदर्शक आयोजनाकरिता त्यांनी शिव सामान्य ज्ञान परीक्षा समितीचे अभिनंदन केले. येत्या काळामध्ये परीक्षेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद मैंद यांनी सांगितले.
भारती नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्षएडवोकेट भारत जाधव नितीन पवार, सुशांत महल्ले, अजय क्षिरसागर, कौस्तुभ धुमाळे, साहेबराव ठेंगे, धर्मेंद्र जळगावकर, महादेव गावंडे, कैलासराव ठेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे, उपमुख्याध्यापिका रिता बघेल, पर्यवेक्षक मनोज नाईक, अनंत जाधव, बलराम मुराडी यावेळी उपस्थित होते.
भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था द्वारा प्रायोजित या परीक्षेसाठी शहरातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला
येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गो मु कनिष्ठ महाविद्यालय, श्री शिवाजी विद्यालय , गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपुर, महात्मा मुंगसाजी विद्यालय, महात्मा मुंगसाजी प्राथमिक शाळा, शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळा, मातोश्री विद्यालय श्रीरामपूर, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर, वसंतराव पुरके कॉलेज बोरगडी, माईसाहेब मुखरे प्राथमिक शाळा, गणपतराव पाटील विद्यालय बोरगडी, वसंतराव नाईक विद्यालय, श्रीराम आसेगावकर विद्यालय, लोकहित विद्यालय, नगरपरिषद प्राथमिक शाळा इटावा, जेएसपीएम विद्यालय इटावा , पोदार लर्न स्कूल, ओयासिस इंग्लिश स्कूल, सेंट मेरीज इंग्लिश स्कूल, माउंट लिटरा स्कूल, जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल, एम पी एन कॉन्व्हेंट, नवजीवन ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, गुरुकुल इंग्लिश स्कूल श्रीरामपूर, इंग्लिश मीडियम आश्रम शाळा गोविंदनगर, सावित्रीबाई फुले शाळा,जिजामाता कन्या शाळा, जिल्हा परिषद वसंतपूर, राष्ट्रीय विद्यालय आडगाव, म. नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळा येरंडा, निजधाम विद्यालय मुडाणा, मातोश्री विद्यालय महागाव, श्री.शिवाजी विद्यालय सवना, एच सी एच हायस्कूल हिवरा, बा.ना. विद्यालय पारवा आणि जगदंबा विद्यालय शेलु यांचा समावेश आहे.
छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे मुख्य मार्गदर्शक शरद मैंद यांच्या मार्गदर्शनात समिती प्रमुख चंद्रकांत ठेंगे यांनी पारदर्शक परीक्षा आयोजनासाठी परिश्रम घेतले. समिती सदस्य अजय क्षीरसागर, मुख्याध्यापक किरण देशमुख, नागेश जोगदे, शशीकांत जामगडे,अमोल शिंदे, गजानन इंगोले, चंद्रशेखर देशमुख, अमोल व्हडगिरे, विजय चव्हाण, मनीष जयस्वाल, सतीश जाधव आदी समिती सदस्य गेल्या महिनाभरापासून नियोजन करत होते.
पुसद अर्बन बँक आणि भारती मैंद पतसंस्थचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळत असते.
सर्व शाळांचे संस्था प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे सहकार्य मिळाले.इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी करण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे. श्री.शिवाजी विद्यालय सवना, निजधाम आश्रम विद्यालय मुडाना आणि राष्ट्रीय विद्यालय आडगाव येथे सोमवारला परीक्षा घेतल्या जाणार आहे.
मोहन सोनकुसरे, प्रवीण किर्तनकार, विक्रम पाटील, रुपेश देशमुख, प्रतिक कोरडे, संतोष पवार, नामदेव बोके, मोरेश्वर उपासे, विशाल पसारे आदी शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला होता.
गुलाबनबी आझाद समाजकार्य महाविद्यालय आणि कॉमर्स ॲकॅडमी चे स्वयंसेवक यांचे सहकार्य मिळाले.
यशस्वीतेसाठी छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे संदीप पाटील , अभिजित पानपट्टे, प्रवीण कदम आदी कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला आहे.