मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुसदच्या विकासाकरिता दिली हिरवी झेंडी…

स्टेडीअम,जलतरण तलाव, व्यापारी संकुल, रुग्णसेवा प्रतिक्षालयासाठी 15 कोटीच्या मागणीची घेतली दखल..
खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनात
शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी दिले प्रस्ताव सादर करण्याचे आदेश…
पुसद शहरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल व टाऊन तसेच रुग्णसेवा प्रतिक्षालयाचे बांधकाम,धर्मवीर आनंद दिघे इनडोअर स्टेडीअम, जलतरण तलाव, आता लवकरच आकारास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख अँड.उमाकांत पापीनवार यांनी खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची नुकतीच भेट घेतली.
या भेटीत वरील सर्व कामासाठी एकून 15 कोटी निधीची मागणी करण्यात आली असून मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रनेला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे.
पुसद शहरात क्रीडा प्रेमींची मोठी संख्या आहे. येथे धर्मवीर आनंद दिघे इनडोअर स्टेडीयम व जलतरण तलावाच्या बांधकामासाठी ५ कोटीच्या निधीची गरज आहे. तसेच नगर परिषदेच्या हद्दीत पुसद-खंड-१, भुमापन क्र.५१/२ कोर्टाच्या शेजारी खुली जागा आहे.
तेथे जलतरण तलाव तसेच धर्मवीर आनंद दिघे इनडोअर स्टेडीयम बनविण्याकरीता प्रयत्न केले जात आहे. या कामाकरीता अँड.उमाकांत पापीनवार यांनी 5 कोटीची मागणी केली आहे.
या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. याव्यतिरीक्त हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल, टाऊन व रुग्णसेवा प्रतिक्षालयाचे बांधकाम करण्यासाठी १० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.
पुसद हे मोठे शहर असल्यामुळे तेथे व्यापारी संकुल, रुग्ण प्रतिक्षालय बांधणे गरजेचे आहे. याकरीता पुसद नगर परिषदेच्या मालकीचे पुसद खंड-१ भुमापन क्र.४५/१ उपजिल्हा रुग्णालय, पुसद समोरील जागा उपलब्ध आहे.
त्यामुळे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल, टाऊन व रुग्णसेवा प्रतिक्षालय बांधकामकरिता १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याने लवकरच नागरीकांच्या या मागण्या पुर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार भावना ताई गवळी यांच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे..