कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांचा न.प.कर्मचारी यांच्या कडून भव्य सत्कार…

कामगार व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी सदैव तत्पर राहणार… लक्ष्मण कांबळे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष
पुसद: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या
आदेशानुसार २८ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे रिपब्लिकन ऑफ इंडिया(आ )कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे यांची नुकतीच नियुक्ती झाली
त्यांच्या नियुक्तीचा पुसद नगरपालिका सफाई कामगार कर्मचारी यांनी दि.०६ फेब्रुवारी रोजी विश्रामगृह पुसद येथे लक्ष्मण कांबळे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रिपाई तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाठोरे होते.
तर प्रमुख उपस्थितीमध्ये अतिक्रमण प्रमुख किरण आत्राम, अशोक भालेराव भीम आर्मी जिल्हाअध्यक्ष,जेष्ट रिपाई कार्यकर्ता प्रकाश धुळे, हे होते न.प.सफाई कर्मचारी जयवंत उचित, मनोज गाडे, उमेश लोखंडे, गजानन नरवाडे, दत्ता पतंगराव, विशाल शिंगारे प्रवीण सिंगारे, भारत घड्याळे, अजय काळे, पवन घड्याळे, आदित्य वाघमारे, राजु सावळे, सिंधू हटकर,सुनील सावळे, गौतम कांबळे,सम्राट सावळे, तसेच रिपाई आठवले पक्षाचे सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्ते इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अंबादास वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण आत्राम यांनी केले..