महाआरोग्य शिबिरात 742 गरजवंत रुग्णांची तपासणी…

गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, विभागीय केंद्र यवतमाळ व माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने…
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय , सालोड वर्धा यांचे ” सर्वरोग निदान व उपचार शिबीर ” गुरुवार 15 फेब्रुवारीला समाजकार्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात 742 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार मोफत करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भालचंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उदघाटक श्री राम देवसरकर , उपाध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर मुबंई विभागीय केंद्र यवतमाळ व प्रमुख उपस्थिती डॉ विनोद आडे, डॉ बिडवाईक, डॉ.राठोड, गजानन जाधव माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन यांच्या साक्षीने संपन्न झाले.
यावेळी शांतीसागर इंगोले, करण ढेकळे, अनंता चतुर सोहम नरवाडे शिवराम शेट्टे
या लोकोपयोगी कार्यासाठी मदतीचा हात पुढे करत अनेकांनी सहकार्य केले त्यात डॉ.रवींद्र वडते यांनी रुग्णांना खिचडी चहा, ऋषिकेश देशपांडे व प्राचार्य शैलेश आंजेगावकर यांनी डॉक्टरांची टीम व स्वयंसेवकांचा भोजनाचा खर्च, निलेश सिंहस्थे यांनी पाणी बॅरल तर स्वस्तिक सुरोशे पाटील यांनी 150 रुग्णांना पुरेल एवढी मोफत औषधी लेबेन लाइफ साइंसेस औषध कम्पनी कडून उपलब्ध करुन दिली.

शिबिरात तपासणी नंतर जवळपास 56 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे पाठवण्यात येणार आहे.
मॅमोग्राफी व्हॅन च्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रकारच्या कॅन्सर ची तपासणी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष अँड.आशिष देशमुख व उपाध्यक्ष राम देवसरकर यांनी पुढाकार घेत अर्थसाहाय्य उपलब्ध करुन दिले होते यावेळी 63 महिलांना कॅन्सर विषयक मार्गदर्शन करून 46 महिलांची तपासणी करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांनाही मदत व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने निर्धार केला आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन पुसदच्या महिला व पुरुष सदस्यांनी, रुग्ण मित्र फाऊंडेशन च्या टीमने व समाजकार्य महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.