देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाची नविन कार्यकारणी गठीतअध्यक्षपदी योगेश राजे तर सचिव पदी मुकुंद पांडे..

पुसद –विदर्भातील 135 वर्षे वय असलेल्ला दे.भ.श.स.सा.वाचनालय पुसद ची नविन कार्यकारणी मंडळाची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणुन योगेश निळकंठराव राजे, सचिव म्हणुन मुकुंद पांडे उपाध्यक्ष अनिल उत्तरवार सहसचिव अनिल तगलपल्लेवार कोषाध्यक्ष रवि देशपांडे सदस्य पदी विजय उबाळे, जय उंटवाल, अमोल साखरे, निलेश मुराई तसेच महिला सदस्य म्हणुन स्मिता वाळले, ॲड श्वेता राजे यांची बिन विरोध निवड करण्यात आली.
दि. 14.02.2024 रोजी झाले्ल्या संस्थेच्या आमसभेत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. अशा निवडी बद्दलचा बदल अर्ज वि. सहाय्यक धर्मादाय आयुक्त यवतमाळ यांच्याकडे दिनांक 22.02.2024 ला दाखल करण्यात आला आहे.
नविन कार्यकारी मंडळाने वाचनालयाच्या कामकाजच्या दृष्टीने दि. 17.02.2024 तसेच दि. 23.02.2024 रोजी कार्यकारी मंडळाची सभा घेतली.
त्यानुसार पुढील कामकाज नविन कार्यकारी मंडळाने जोमाने सुरु केले आहे. गेल्या काही दिवसापासुन ज्या व्यक्तीचा संस्थेशी सभासद म्हणुनही संबंध नाही. अशा व्यक्तीकडुन संस्थेचे सचिव असल्याचे भासवुन संस्थेच्या नावाने विशेष आमसभा घेत असल्याबद्दल बनावट सुचना पत्र पोष्टाव्दारे, वितरीत केल्या जात आहे.
तसेच इतर संवाद माध्यमातुनही अशा प्रकारचे सुचना पत्र प्रसारीत केल्या जाते आहे. तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी नागेश गांधे यांना सचिव चंद्रकांत गजबी असे नांव सही व संस्थेच्या बनावट सचिवाचा शिक्का मारलेली नोटीस प्राप्त झाली आहे.
त्यानुसार वाचनालयाचे प्रागणामध्ये दि. 03 मार्च 2024 ला सभा होत असुन त्या संबंधी तयारी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या नोटीसवर संस्थेच्या माजी उपाध्यक्ष यांची पण सही व बनावट शिक्का मारलेला आहे.
या वरुन वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे यांनी शहर पोलीस स्टेशन येथे दि. 01 मार्च 2024 ला तक्रार दाखल केली आहे. दि. 03 मार्च 2024 रोजी होत असलेली तथाकथीत सभा संस्थेच्या आवारात घेऊन या ठिकाणी गोंधळ घातल्यास संस्थेच्या ईमारतीस ईजा पोहचविल्यास तसेच संस्थेच्या कर्मचारी वर्गाला शारिरीक ईजा पोहचविल्यास बनावट सचिव व यांच्या सोबत षडयंत्र रचणारे सहकारी जबाबदार राहतील असे या तक्रारीत नमुद केले आहे.
तरी दे.भ.श.स.सार्वजनिक वाचनालयाची नविन कार्यकारणी गठीत झाली असुन संस्थेच्या सभासदांनी अशा प्रकारच्या खोट्या व बनावट तथाकथीत सभेस उपस्थित राहून संभ्रामास बळी पडू नये..