पुसद येथील सार्वजनिक वाचनालयात घाणेरडे राजकारण…

पुसद येथे नुकतेच वाचनालयाच्या नवीन कार्यकारिणीची नावे वाचण्यात आली. त्यामध्ये लिहिल्यानुसार 14 फेब्रुवारी 2024 रोजी आमसभा झाली आणि त्या आमसभेमध्ये नवीन कार्यकारणी जाहीर झाली असे सदर बातमीमध्ये नमूद आहे.
मात्र वाचनालयाच्या सभासदांना आम सभेची कुठल्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही, तसेच कुठल्याही वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिरात दिसली नाही. आम सभेनंतर निवडणुकीसाठी लागणारा कालावधी ही कुठेही नमूद केल्या गेलेला नाही,
असे असतानाही सदर बातमी नुसार आमसभा होऊन नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. असे वर्तमानपत्रात नमूद आहे आम सभेमध्ये कार्यकारणी गठीत करण्यासंदर्भात कुठेही कायदा नाही.नियमानुसार कार्यकारणी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
अशी कोणतीही प्रक्रिया वाचनालयात झालेली नाही, नवीन कार्यकारणी ही फ्रॉड आहे , फसवी आहे, कोणत्याही निवडणुकी शिवाय कार्यकारणी होऊ शकत नाही स्वतः
अध्यक्ष समजून निर्णय घेणाऱ्यांना याची पूर्ण माहिती असून सर्व लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकून ते आपला स्वार्थ साधत आहेत
आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्यांनी स्वतःकडे अध्यक्षपद ठेवलेले आहे आणि135 वर्षाची परंपरा लाभलेल्या वाचनालयाला कलंकित करण्याचे काम सदर अध्यक्ष करत आहेत,
अध्यक्ष जर प्रामाणिक असते तर मागील आमसभे नंतरच त्यांनी निवडणूक घेतली असती परंतु तसे न करता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व कारभार ते स्वतः बेकायदेशीर पणे करत आहेत.

आमच्या कार्यकारिणी ने दिनांक. २९-०१-२०२४ रोजी वाचनालयात सभा घेतली सदर सभेकरिता अध्यक्ष ग्रंथपाल तर उपस्थित राहिलेच नाहीत तर सर्व कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवून वाचनालय बंद ठेवले
त्यामुळे सदर सभा आम्हाला नाईलाजाने वाचनालयाच्या प्रांगणात घ्यावी लागली त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेस वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन देऊन सर्व सभासदांना प्रत्येक गोष्ट कळविली व त्यानंतरच आम्ही विशेष आमसभेची दिनांक 3 मार्च ही तारीख निश्चित केली सदर आम सभेच्या सभेच्या रीतसर नोटीस सुद्धा सर्व सभासदांना आम्ही पाठविल्या तसेच आमसभेबाबत दिनांक 29 2 2024 ला दैनिक दैनिक मतदार मध्ये आमसभेची जाहिरात सुद्धा दिली अशी असताना सुद्धा अध्यक्ष महोदयांनी आजपर्यंत यापैकी कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही किवा अडचण दाखविली नाहीm किंवा न्यायालयातून या बाबींवर कोणत्याही प्रकारचा स्टे आणला नाही कारण त्यांना स्पष्टपणे माहीत होते.
आम्ही जे काम करत आहोत ते सर्व न्याय संगत होते परंतु अध्यक्षांना सत्तेचा व स्वार्थाचा मोह सुटत नव्हता त्यामुळे शेवटी त्यांनी न झालेल्या आम सभेचा चुकीचा मार्ग अवलंबून आपली कार्यकारणी गठित करून सर्व सभासदाच्या विश्वासाला तडा दिला आहे.
अशा खोटारडे अध्यक्ष ला धडा शिकविण्याकरिता आपण आमसभेत उपस्थित राहावे.
असे आवाहन
सौ अनघा गडम उपाध्यक्ष, रविकिरण देशपांडे कोषाध्यक्ष, चंद्रकांत गजबी सचिव, विनोद पाटील सदस्य, आशिष देशमुख सदस्य ,डॉ. उमेश रेवनवार सदस्य, विजय उबाळे सदस्य, सौ सुनिता तगडपल्लेवार महिला सदस्य. कृपया उद्या दि. 3 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता आम सभेला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे …