श्रीक्षेत्र माहूरगड ते रायगड शिवनेरी गड पदयात्रेत सहभागी व्हावे राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांचे प्रतिपादन..
पुसद – श्री संत बाळगीर महाराज ग्राम स्वच्छता अभियान आनंद दत्त धाम आश्रम श्री क्षेत्र माहुरगड द्वारे विश्ववंदनीय राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी महाराष्ट्रामध्ये गाव तिथे ग्राम स्वच्छता अभियान राबवून ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक, व्यसनमुक्ती , वृक्षारोपण , अंधश्रद्धा निर्मूलन , इत्यादी विषयावर मोलाचे मार्गदर्शन करून स्वच्छतेचा संदेश देत आले आहेत ,
तरी त्यांची पुसद येथे दिनांक 20/03/2024 रोजी बुधवारी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पुसद येथील पत्रकार यांच्याशी संवाद साधला होता यावेळी पुसद येथील पत्रकार बांधवा तर्फे राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांचा यथोचित सत्कार करण्यात आला असून यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत साईनाथ महाराजांनी राष्ट्रगीत घेऊन सर्व उपस्थित पत्रकारांचे सन्मान करून मार्गदर्शन केले आहे.
मागील कोरोना महामारीच्या काळामध्ये आनंद दत्तधाम आश्रम माहूरगड द्वारे दीडशे क्विंटल अन्नधान्य किट वाटप करण्यात आले आहेत .
स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहून वाघा बॉर्डरवर महाराजांनी सात दिवस स्वच्छतेचा संदेश देत सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांची नातेवाईक यांना मोफत जेवणाची व्यवस्था माहूर मुदखेड जिंतूर सेनगाव वसमत इत्यादी ठिकाणी करण्यात आलेली आहे.
अत्याचार ग्रस्त मुलगी व त्यांचे आजी यांना अजन्म दत्तक घेतले असून त्यांच्या या सामाजिक तात्परतेमुळे महागाव येथील नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी त्यांची सेवा पाहून ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली तसेच महागाव तहसीलदार यांनी कोरोणा योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे .
राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या गुरुकुंज आश्रम मोझरी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे घर सेवाग्राम पर्यंत गावोगाव स्वच्छता अभियान करत सुमारे 500 अनुयासह दिनांक 13 एप्रिल 2019 रोजी पदयात्रा काढण्यात आली होती.
महाराजांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बऱ्याच प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे .
साईनाथ महाराजांच्या कार्याची नुकतीच नांदेड चे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिनांक एक मार्च रोजी दखल घेतली असून त्यांना त्यांच्या करण्यात येत असलेल्या कार्याबद्दल प्रशंशी पत्र देऊन गौरव देखील करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांनी दिनांक 9 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान माहूरगड ते रायगड पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेत असंख्य अनुयायाने उपस्थित राहण्याचे आवाहन य
करण्यात आले असून यावेळी पुसद तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते..