मानवतेसाठी घड्याळाची वेळ हि न पाहणारे मानवतावादी माणुसकीच्या भिंतीचे मानवीय कार्य…
जे का रंजले गांजले, त्यासी मनी जो आपुले,भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी आणि निराधार यांना आधार, कपडे देऊन आपण समाजाचे काही देणे लागतो,ही भावना जोपासण्याचे कार्य माणुसकीची भिंत व परिवार मागील आठ वर्षापासून कार्य करीत आहे.
तसेच आणखीन एक कार्य माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद व नंददीप फाउंडेशन यवतमाळ मनोरुग्ण सेवा केंद्र यांच्या माध्यमातून मनोरुग्णसेवेचे कार्य पार पाडते आहे,
पुसद येथील गोविंद नगर चिंतामणी चौक येथे मागील दहा ते पंधरा दिवसापासून वास्तव्यास असलेल्या मनोरुग्ण बेघर अनाथ महिलेला माणुसकीची भिंतच्या माध्यमातून मनोरुग्ण निवारा केंद्र नंददीप फाउंडेशन फाउंडेशन येथे स्थलांतरित करण्यात आले.
महिलेचा मागील काही दिवसापासून गोविंद नगर येथील रहिवाशांना त्रास होत असल्याचे येथील नागरिकांनी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद टीमला कळविले .
या महिलेची ओळख पटत नसल्याने सदर महिलेची माहिती पोलीस स्टेशनला देऊन मनोरुग्ण महिलेला माणुसकीची भिंत च्या मार्फत नंददीप फाउंडेशन येथे रात्री बारा वाजता औषधोपचार करिता पाठविण्यात आले.
याप्रसंगी मानवतेची साद ऐकून रोहन साहेबराव पारध, इमरान भाई वरूड, विशाल महानोर, ऋषभ डोळस, शब्बीर भाई,राहुल धोतरकर, फिरोज भाई,आसद भाई, मिंटू भाटिया यांनी महिलेस नंदादीप फाउंडेशन यवतमाळ येथे पोहोचविण्यास सहकार्य केले,
या कार्यास पोलीस पोलीस स्टेशन पुसद शहर येथील माननीय दिनकर दमकुंडावार,अमित मैदनकर, रजनी बानाईत, वंदना जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्टेशनचे सुद्धा सहकार्य लाभले याप्रसंगी माणुसकीच्या भिंतीचे मार्गदर्शक परशुराम नरवाडे,अध्यक्ष गजानन जाधव,उपाध्यक्ष संतोष गावंडे, सचिव सोहम नरवाडे,साहेबराव केवटे व ऋषिकेश जोगदंडे यांनी मोलाचे सहकार्य केले..