देश
पवन हरीमकर यास एमबीबीएस पदवी प्राप्त…
पुसद :—येथील ज्येष्ठ पत्रकार दीपक हरीमकर व प्राध्यापिका सौ अर्चना हरीमकर यांचा मुलगा डॉ.पवन दीपक हरीमकर याने नुकतीच एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केली आहे.
डॉ.पवन दीपक हरीमकर हा नाशिक येथील एस एम बी टी महाविद्यालयाचा सन 2018 च्या बॅचचा विद्यार्थी होता.
पवन चे नर्सरी पासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण पुसद येथील नवजीवन ज्ञानपीठ इंग्लिश मिडीयम स्कूल येथे झाले होते.
पवन हा मुळातच अभ्यासू व हुशार विद्यार्थी होता. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील ,काका काकू व शिक्षकांना देतो . डॉ. पवन ने एम.डी.करून समाजाची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला.
विशेष म्हणजे पवनचा भाऊ आयुष हा सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथे प्रथम वर्षाला एमबीबीएस ला शिकत आहे.