•माणूसकीची भिंत व मिशन ग्रीनच्या आवाहनाला प्रतिसाद..,
•पोरक्या अस्मिताच्या कन्यादानासाठी धावली माणुसकी..
पुसद मुलीचे कन्यादान हे श्रेष्ठ दान मानले जाते.पण नियतीच्या फेऱ्यात अडकलेल्या अनेक दुर्दैवी बापाच्या व त्या कन्येच्या नशीबात हे नसतं.अशीच वेदनादायक परिस्थिती पुसद परिसरातील अस्मिता दिलीप पोटे ह्या मुलीच्या वाट्याला आली.आईवडीलांचे अकाली मृत्यू झाले.तीन मुलींचा सांभाळ जेमतेम परिस्थिती असलेल्या काकाने केला.
दोन मुलींचे लग्नही लावले.पण तिसऱ्या मुलीच्या अर्थात अस्मितेच्या लग्न खर्चाचा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला
खचलेल्या काकाला माणुसकीची भिंत व मिशन ग्रीन ह्या संवेदनशील संस्था धावुन आल्या.अस्मिताचे कन्यादान आम्ही करु असा विश्वास देत तब्बल सतरा हजार नेने रुपयांची भांडी ,दिवान दिली. तर प्रत्यक्ष वस्तु स्वरुपात शेगडी ,फॅन कुकर आदि वस्तू देऊन तिच्या संसारासाठी ठोस मदत केली.
या कामी माणुसकीची भिंतीचे गजानन जाधव तर मिशन ग्रीन पुसदच्या वतिने अमित बोजेवार यांनी पुढाकार घेतला.यांच्या हाकेवर अनेक संवेदनशील शुभचिंतकांनी भरभरून मदत करत एका गरीब कुटुंबातल्या पोरक्या मुलीचे कन्यादान करुन समाजापुढे एक नवीन आदर्श उभा केला.
काही दिवसापूर्वी तिसऱ्याही मुलीचे लग्न जुळते त्यांना कळते की माणुसकीची भिंत अशा अनाथ अत्यंत गरजू असलेल्यांना मदत करते माणुसकीच्या भिंतीकडे धाव घेऊन त्यांनी माणुसकीच्या भिंतीला भांड्याची मागणी केली माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसदने व मिशन ग्रीन पुसद लोक वर्गणीतून सतरा हजार नऊशे रुपयाची व काही भांड्याची मदत आली त्यामध्ये माणुसकीची भिंतीने सहा हजार रुपयाचा दिवाण व उर्वरित रक्कम₹ अकरा हजार चारशे रुपयाची संसार उपयोगी भांडे स्वरूपात मदत करण्यात आली मदत करणाऱ्या दात्यांची नावे माणुसकीची भिंत 2000,कौस्तुभ धुमाळे 1000, पवन बोजेवार1000,स्वप्निल महाजन500,सनी राय 500,प्रा. प्रकाश लामने1000,ज्ञानेश्वर राऊत 500, पी .आर .नरवाडे 500,प्रवीर व्यवहारे 1000,विलास सर भवरे 1000,संतोष तडकसे देवा मेडिकल 500,अविनाश मुखरे200,रेवन जागृत साहेब 1000,विजय विश्वकर्मा सर 500, सागर आदिनाथ भागवत 500,श्रावणी उद्धव गादेवार त्रिमूर्ती हार्डवेअर 1000,प्रभाकर टेटार सुमित नर्सरी वरुड 500,विजय पाटील251,जयश्री गावंडे 100,श्री अखिलेश अग्रवाल 500,सौ अर्चना ताई यादव 201,श्री लक्ष्मीकांत लामकाणीकर 1000,एडवोकेट विवेक टेहरे 500,सीमाताई जाधव मुंबई 1000,ऋषिकेश देशपांडे गणोबा मंगल कार्यालय 1000,कुमारी वैष्णवी क्षिरसागर 200,केशवजी टेकाळे सर यांच्याकडून एक शेगडी एक कुकर एक पॅन, गजानन आरगुलवार सुभाष इलेक्ट्रिक हाऊस एक सिलिंग फॅन व यावेळेस उपस्थित मान्यवर कुमारी अस्मिता दिलीप पाटे, गौरी नारायण काकडे, चांदोबा नारायण चिकणे, नारायण रामा काकडे, आशीर्वाद गोविंद उचाडे, विनायक उत्तमराव बोंपिलवार, सुमित सुभाष कवटे ,तसेच ग्रीन मिशन पुसदचे पवन बोजेवार शिवप्रभा ट्रस्टचे परशुराम जी नरवाडे, माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव ,उपाध्यक्ष संतोष गावंडे ,सचिव सोहम नरवाडे ,सदस्य पंजाबराव ढेकळे अनंताभाऊ चतुर, अरुण नागुलकर, धनंजय आगाम, साहेबराव केवटे, उपस्थित होते..