दुचाकी पळवून नेणाऱ्या चोरट्यास वसंत नगर डि.बी. पथकाने केले जेरबंद..
उभी केलेल्या दुचाकीस चोरी करून पळवून नेणाऱ्या 2 चोरट्यास वसंत नगर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाने अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची रिवारर्डेड कामगिरी केली आहे.
दिनांक 20 जून 2024 रोजी शेख शब्बीर शेख मन्सूर व 42 वर्ष राहणार राम रहीम नगर पुसद हा नेहमीप्रमाणे मुन्ना शेठ नामक व्यक्तीच्या घरासमोर शेख शब्बीर यांनी आपली दुचाकी क्र. MH 37 E 5742 उभी केली.
आणि तेथून काळाराम मारोती मंदिर येथे कामाला गेला. काम आटोपल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कामावरून परत आल्यानंतर गाडी चोरी गेल्याचे दिसले.
सर्वत्र शोध घेतला असता कुठेही मिळून आल्याने अखेर दिनांक 24 जून 2024 रोजी वसंत नगर पोलीस स्टेशन येथे चोरी माहिती दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वसंत नगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अशोक चव्हाण, मुन्ना आडे, संजय पवार यांनी पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि 26 जून रोजी दीपक गायकवाड व मिथुन सूर्यवंशी यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून चोरी गेलेली मोटरसायकलही हस्तगत करण्याची रिवार्डेट कामगिरी डीबी पथकाने पार पडली. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विष्णू नालमवार हे करीत आहे..