रोहडा येथे डेंगूणे घेतला बारा वर्षीय चिमुकल्याचा बळी…
डेंगूचे आणखीन दहा रुग्ण गंभीर
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बीडिओला निवेदन..
पुसद तालुक्यातील रोहडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या एका १२ वर्षीय चिमुकल्याचा डेंगू ने बळी घेतला आहे.गावात डेंगूची साथ सुरू असताना ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यानेच दखल घेऊन संबंधिताची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दि.२५ जून २०२४ रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.गावामध्ये सध्या स्थितीत डेंगूचे दहा रुग्ण गंभीर आहेत हे विशेष.
सुमित पुंडलिक आल्हाट हे बारा वर्षे राहणार रोहडा असा बळी घेतलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचा दि.२५ जून २०२४ रोजी मेंदूच्या आजाराने मृत्यू झाला होता.त्याच्यावर गेल्या सहा ते सात दिवसा पासून पुसद,नांदेड नंतर अकोला येथे उपचार सुरू होता.अकोला येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान सकाळी ४ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला आहे.
गट विकास अधिकाऱ्याला दि.२५ जून २०२४ रोजी निवेदन दिले आहे.त्या निवेदनात असे म्हटले आहे की, रोहडा गावातील ग्रामपंचायत सचिव अनिल काकडे यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रार देऊनही फवारणी व नाली सफाई केली नाही.ग्रामपंचायतीचे सचिव तक्रारीचे निराकरण करण्यासाठी टाळण्याचा प्रयत्न करतात.
सोबतच गावकऱ्यांना उद्धट वागणूक देतात. ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे १२ वर्षीय सुमिता डेंगूने नाहक बळी घेतल्याने गावामध्ये सध्या संतापाची लाट सुरू आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की दहा ते पंधरा जणांना डेंग्यूची लागण झाली असून देखील ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची उपाययोजना आरोग्य विभागामार्फत केल्या जात नाही.
गटविकास अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनावर केशव धायगोडे,सुमित गुंजकर,दीपक पायघण, गजानन चवरे, विनोद चवरे, पंकज जैस्वाल,पांडुरंग पोपळघट, हनुमान वानखेडे,मारोती पोपळघाट,ज्ञानेश्वर पोपळघट अरुण ढोक यांच्या सह्या आहेत.