पुसद तालुक्यातील रोहडा शेतशिवारात सुमारे दोन तास ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान;…
जाणकारांच्या मते मागील 40 वर्षातही एवढा पाऊस आला नाही!
पुसद तालुक्यातील माळ पठारावरील रोहडा परीसरात संध्याकाळी दि.३०जून रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह व वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही खरडून गेली आहे .
गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला अचानकपणे पूर येऊन पुलावरून सुमारे दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने गावातील काही भागात घरात पाणी शिरलं आहे. तसेच अनेक घरात व शेती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रात्री आलेल्या सुसाट्याच्या वाऱ्याने काही ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या विद्युत वाहिनीच्या तारावर पडल्याने विद्युत वाहण्याचे तारे तुटली तर गावाला विद्युत पुरवठा करणारी मुख्य डीपी कोलमडून पडली असून त्यामुळे महावितरण विद्युत विभागाचे खांब उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.
नागरिकांना आता पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून पावसानं जोरदार हजेरी लावली.
या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.् माञ गाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
अनेकांच्या शेतीचे बांध फुटून शेताबाहेर पाणी वाहिले असल्याने शेती खरडुन गेली आहे. या भागात शेकडो एकर पिकांचे नुकसान झाले असून
खरीप पिके वाया गेली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे तलाठी व कृषी सहायक यांच्यावतीने नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
पुसद तालुक्यातील येलदरी गाजीपुर शेत शिवारात अशाच प्रकारची ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची प्रार्थमिक माहिती कळली आहे.