पुसद येथे ट्रकच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू..
पुसद / ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्कळजीपणाने चालवून रस्ता ओलांडणाऱ्या युवकास धडक दिली. या धडकेत युवक ठार झाल्याची घटना घडली.
आज सकाळी नऊ वाजता चे दरम्यान शिवाजी वार्डातील 35 वर्षीय युवक सतीश नारायण जाधव हा रस्ता ओलांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुभाष चौकाकडे जाणाऱ्या एम एच 29 टी 2288 चे ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून सतीश यास धडक दिली.
गंभीर गंभीर अवस्थेत सतीश जाधव यांना घटनास्थळावरील इसमांनी लगेच लाईफ लाईन हॉस्पिटल येथे भरती केले परंतु गंभीर अवस्था असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारात यवतमाळ येथे रेफर केले.
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात उपचारांती सतीश जाधव याचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत मृतकाचे नातेवाईकांनी कुश शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करी ट्रक व ट्रकचालक यास ताब्यात घेऊन पुढील तपासात सुरुवात केली आहे.