ॲड.प्रदिप नरवाडे सेट उत्तीर्ण..
पुसदचे भुमी पुत्र ॲड.प्रदिप नरवाडे यांनी नुकतीच सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा वाणिज्य विषयात चांगल्या श्रेणीतून उत्तीर्ण केली आहे.
सदर परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपकेंद्र असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने दि. ७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आली होती.
त्या परीक्षेचा निकाल दि.५ ऑगस्ट २०२४ रोजी लागला आहे.ॲड.नरवाडे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.
यापूर्वी ते बी.कॉम.एम.कॉम.,एमबीए,एलएलबी,एलएलएम.,डिटीएल,डिसीएल,जिडीसी ॲण्ड ए.,(ईम्पॅनल) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
ते यशाचे आई विद्या वडिल मारोती,भाऊ दिलीप,बहिण ॲड.सुशिला,मिलींद हट्टेकर,अनिल हट्टेकर व त्यांच्या शैक्षणिक जिवनातील सर्व गुरुजनां देत आहेत.
यात विशेष म्हणजे त्यांनी कुठेही स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले नव्हते.त्यांनी स्वबळावर अभ्यास करून यश संपादन केले आहे.