मा.माधवराव वैद्य यांना मातृशोक..
19/0824रोजीमातोश्री देवकाबाई रुखमाजी वैद्य यांचे वयाच्या 92 वर्षी दुःखद निधन..
महागाव तालुक्यातील बिजोरा येथील रहिवासी मा. राज्याचे सामाजिक न्याय विभाग उपायुक्त माधवराव वैद्य यांच्या त्या मातोश्री. यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना माझी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की अत्यंत हलकीच्या परिस्थितीवर मात करून सुसंस्कृत कुटुंब मातोश्री देवकाबाईने घडविले त्यांचा आदर्श समाज बांधवांनी घेतला पाहिजे आई वडिलांची शिकवण घेऊन वैद्य साहेबांनी राज्यांच्या सामाजिक न्याय विभागाचे उच्च पद भूषविला ही शिक्षणाची किमया आहे आणि वैद्य साहेबांच्या आई वडिलांची मेहनत आहे असे भावनिक उद्धार श्रद्धांजलीपर भाषणात माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांनी भाषणात काढले यावेळी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेवराव ससाने यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर आईचा आदर्श समाजाला दिशा देणारा आहे समाजासाठी हा आदर्श आत्मसात केला पाहिजे असे उदगार आमदार ससाने साहेब यांनी काढले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष एड. आशिष भाऊ देशमुख सांत्वन पर भेटी प्रसंगी उपस्थित होते .उमरखेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देविदास मोहकर, प्राध्यापक सुरेश धनवे ,परसराम डवरे नारायण घुमनर पंचायत समितीचे माजी सभापती व असंख्य गावकरी उपस्थित होते त्यांच्या जाण्याने बिजोरावासीयांवर दुःखाची शोककळा पसरली.त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.