माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे राळेगावातील तहसीलदार यांना निवेदन..
राळेगाव दिनांक 23 ऑगस्ट रोजी माजी सैनिक कल्याण संघटना यवतमाळच्या वतीने राळेगाव येथे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले त्यामध्ये सध्या देशातील स्थिती बघता..
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक वाढले असल्याने शासनाचे दोषींवर कठोर कार्यवाही करावी जेणे करून अश्या घटना पुन्हा पुन्हा न व्हावं व महिलांकडे दृश्ट नजरेने पाहणाऱ्या नराधमांनां शासनाची भीती व जनतेतील रोष्याचे भय त्यांच्या मनात उत्पन्न व्हावे अश्या उद्देशाने निषेध रॅलीचे आयोजन माजी सैनिकांच्या वतीने मेजर जीवन कोवे ह्यांचा नेतृत्वात राळेगाव येथे घेण्यात आले.
ह्या निषेध रॅली मागचा दुसरा उद्देश असा होता की जे राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्ग येथील महिलांवर जो अत्याचार करून जिवे मारण्यात आले त्या प्रकरणात शासन दोशीला कठोर शिक्षा करेलच आम्हाला शास्वती आहे. कारणं आम्हीं फौजी असल्यामुळे न्याय व्यवस्थेवर आमचा तीळ मात्र संशय नाही..
न्याय पालिका अजूनही ह्या देशात जिवंत आहे.असा दृढ विश्वास आमचा आजही कायम आहे. ह्या प्रकरणात दोषिला जी सजा व्हायची ती सजा शासन करतीलच .पण पिढीतेच्या नसल्यामुळे व एक आई विना त्या मूलांच काय होईल?
असा प्रश्न जेंव्हा आम्हाला पडला त्यामूळे आम्ही माजी सैनिक ह्या काळी फित निषेध रॅलीच्या माध्यमातून शासनाकडे अशी मागणी केली की पीडितेच्या मुलांना वयस्क होईपर्यंत नामांकित शाळेत लागणारा शिक्षणाचा खर्च व भरण पोषनाचा खर्च शासन स्वतः जबाबदारी घेवून त्या मुलांना समाजात शिक्षीत व सूज्ञ नागरिक बनतील अश्या तऱ्हेचे वर्तन लावण्याकरिता मुलांना अर्थिक मदतीची गरज शासनाकडून पुरवली जावी ही मागणी घेवून आज माजी सैनिक तहसिल कार्यालयावर काळी फित बांधून निषेध रॅलीच्या माध्यमातून पोहचले..
हया वेळी संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक जगत राजाराम चव्हाण मेजर इंद्रजीत लाभणे. मेजर रामदासजी धुर्वे , मेजर अरुण बाराहाते, मेजर पंढरीनाथ बोरकर..
मेजर गुरुदास नगराळे, मेजर गजानन ठाकरे, मेजर सुनील कोवे, आणि ज्यांनी ह्या निषेध रॅलीचें आयोजन व नेतृत्व केले ते मेजर जीवन कोवे माजी सैनिक तसेच अरुण केराम, चंदू कोवे, सुनीता तोमर माजी सरपंच, हनुमान मडावी, चेतन कन्नाके, सूरज गुजरकर, रामदास दुर्वे प्रदुण्य इंगोले मेघश्यामजी चांदे सौरव नारनवरे माला शंकर पेंदाम सविता हनुमान मडावी शीतल ताई व मस्कोल्हे ताई आणि समाजबांधव इत्यादी निवेदन देतांना उपस्थिती होते..