धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पोलीस ठाण्यावर दगडफेक…
दीडशे दगडफेक करणाऱ्यावर गुन्हे नोंद, ९ जण अटक
पुसद काही समाज घटकांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याची घटना दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या रात्री ८.४५ ते ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. दगडफेक करणाऱ्या दीडशे जनावर गुन्हा नोंद करण्यात झाले आहे. त्यापैकी नऊ जणांना पोलिसांनी तात्काळ अटक करण्यात आली आहे.
जिशान उर्फ सय्यद नूर सय्यद शरीफ वय २१ वर्षे रा.वसंतनगर, शेख अरशद शेख वहाब वय २२ वर्षे रा. अखिरतनगर, शेख वसिम शेख युनुस वय ४० वर्षे रा. पार्वतीनगर,शेख अतिक शेख रशिद वय २२ वर्ष रा. शिवाजी वार्ड,फरदीन खान फिरोज खान वय २० वर्षे वंसतनगर, मो.सर्फराज मो सलीम तेली (जाटू) वय २५ वर्ष रा. नेहरुवार्ड कापड लाईन,मो. सोहेल मो. सलीम तेली(जाटू)वय २६ वर्षे रा. नेहरुवार्ड कापड लाईन, मोहम्मद ईरफान मोहम्मद रफीक वय २५ वर्षे रा. वंसतनगर,एजाज निरबान युनुस निरबान वय ३४ वर्ष रा. नुरकॉलनी या नऊ जणांना दि.१८ सप्टेंबर 2024 रोजीच्या ६.३० अटक करण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्यामध्ये इतर दीडशे आज्ञाता विरोधात दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजीच्या संध्याकाळी ४.५४ वाजता गुन्हे दाखल झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी च्या रात्री ते १५० ते १७५ अनोळखींनी दंगा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमवुन जमावातील काही लोक पोलीस ठाण्यात आले.त्यांनी आक्षेपार्ह नारेबाजी करुन चिथावणी देवुन, शासकीय वाहन व रस्ता आडवुन कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना धक्काबुक्की व दगडफेक करुन जखमी केले.शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलीसांवर दगडफेक केली. तसेच पोलीसांना धक्काबुक्की करुन पोलीस ठाण्याच्या प्रांगणात धिंगाणा घातला.
विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडला असा प्रकार
शहर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. धिरज रत्नाकर बांडे यांनी दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी गणशोत्सव असल्याने ते पोलीस स्टेशन ठाण्यात कर्तव्यावर हजर असतांना रात्री अंदाजे ९ वाजता च्या सुमारास १५० ते २०० बेकायदेशीर जमाव मोटर सायकलवर डबलशीट व ट्रिपल शिट कोणतीही पूर्व सुचना न देता पोलीस ठाण्याच्या आतमध्ये आले व ईन्स्टाग्रामवर मुस्लीम धर्मीयांचे व्हिडीओवर कोणीतरी अज्ञात ईसमाने आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. सदर पोस्ट टाकणाऱ्या ईसमावर आत्ताच गुन्हा नोंद करुन त्याला अटक करा अशी मागणी केली. जमावातील सर्व लोक मोठमोठ्याने नारे तकदीर अल्ला हु अकबर” अशी नारेबाजी करु लागले. तेंव्हा पोलीस स्टाफ तसेच ठाणेदार पो. नि. उमेश बेसरकर, स.पो.नि. निलेश देशमुख, पो.हे.कॉ.चंद्रकांत जाधव,पो.हे.कॉ. निलेश उंचेकर, पो.हे.कॉ. प्रल्हाद राठोड, पो.हे.कॉ. मनोज कदम,पो.ना. दिनेश सोळंके, पो.कॉ. आकाश बाभुळकर, म.पो.कॉ. शितल चक्रनारायण, म.पो.कॉ. अश्वीनी, पो.कॉ. सुनिल जाधव,चालक पो.कॉ. राजेश जाधव, पो.कॉ. रविन्द्र खंदारे, पो.कॉ. नितेश भालेराव, पो.हे.कॉ. जलाल शेख असे मिळुन जमावातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करुन जमावास पोलीस ठाण्याच्या आवाराच्या बाहेर जाण्यास सांगीतले. तेंव्हा पोलीस ठाण्या समोरील रोडवर जमावातील लोक खाली बसुन रोड जाम करु लागले.त्यातील काही लोक पोलीस पोलीस ठाणे मे घुसो असे म्हणुन चिथावणी देवु लागले. तेंव्हा जमावातील लोक प्रक्षोभकपणे नारेबाजी करत असल्याने जमाव भडकुन अनियंत्रीत होवु लागला. तेंव्हा सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी हे शासकीय वाहनाने पोलीस ठाण्यात येत असतांना गेटवर जमा झालेल्या जमावाने त्यांचे बाहन अडवीले. तेंव्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बि.जे.यांनी जमावास शांत राहण्याचे आवाहन केले असता जमाव जोरजोराने ओरडुन नारे देवुन पोलीसांच्या अंगावर येवु लागले.तेंव्हा कसेबसे जमावातील लोकांना बाजुला करु लागले.
आक्षेपहार्य नारेबाजी केल्याने झाली दगडफेक, पोलीसही झाले जखमी
शहर पोलीस ठाण्याचा पोलीस स्टाफ जमावाला समजावुन सांगत असतांनाच जमावातील लोकांनी गुस्ताखे नबी की एक सजा, सर तनसे जुदा सर तन् जुदा असे प्रक्षोभक नारे देवुन
पोलीसांना व पोलीस स्टाफला धक्काबुक्की व लोटालोटी करु लागले व जमाव अचानकपण आक्रमक होवुन अनियंत्रीत झाला. सदर जमाव अनियंत्रीत झाल्यामुळे तो पोलीस खाण्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागला. जमाव हा पोलीस स्टेशनमध्ये घुसून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्याची शक्यता असल्याने, पोलीस व समोर उभे असलेल्या पोलीस स्टाफनी जमावास पोलीस ठाण्यात घुसण्यास प्रतिबंध केला असता जमावाने सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्यासह पोलीस स्टाफसोबत धक्काबुक्की केली असता त्यांना डावे हाताचे बोटाला मार लागला.तेंव्हा व सोबत पोलीस अधिकारी अंमलदार यांनी किमान बळाचा वापर केला.तेंव्हा सदरचा जमाव थोडे अंतर पुढे जावुन त्यानंतर जमावातील लोकांनी पुन्हा पोलीस ठाण्याकडे दगडफेक केली असता दगडफेकीमध्ये पो. हे. कॉ. निलेश उंचेकर,पो.कॉ. रविन खंदारे हे जखमी झाले. सदर बेकायदेशीर जमाव हा ज्या वाहनांवर पोलीस ठाण्यात आला ती वाहने पोलीस ठाण्यासमोर कडून पसार झाले.त्या वाहनांची पाहणी केली असता, त्यांची संख्या एकुण ४६ आढळून आली आहे.