खुल्या भूखंडावर बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न..
पुसद : स्वामी विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेमार्फत मालकीच्या खुल्या भुखंडावर बळजबरीने ताबा करण्याचा प्रयत्न सुरू आहे,
अशी तक्रार संस्थेच्या अध्यक्षाकडे देण्यात आली आहे.
पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील संजय जनार्दन रेक्कावार यांचे वडिल जनार्दन रेक्कावार (मयत) यांनी स्वामी विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्था श्रीरामपूर यांच्याकडून ले-आउटमधील प्लॉट क्र. ५४
हा विकत घेतला.
याबाबतची खरेदीही संस्थेने १९८१ ला करून दिली. त्यामुळे सदर प्लॉट हा मालकीचा आहे.
मात्र प्लॉट क्र. ५३ च्या मालकाने सदर ५४ क्रमांकाचा प्लॉट मध्ये काही जागा असल्याचा दावा करीत आहे.
तसेच तो बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. प्लॉटवर जाण्यास मज्जाव करीत आहे.
त्यामुळे प्लॉटची शासकीय मोजणी करावी, अशी मागणी संजय रेक्कावार यांनी केली आहे.
शिवाय ग्रामसेवकांनाही निवेदन देऊन प्लॉटचा फेरफार करू नये, अशी मागणी केली.