धारदार तलवारीसह आरोपी एलसीबीच्या जाळ्यात..
पुसद शहरातील संभाजीनगर परिसरामध्ये ५ नोव्हेंबर २०२४ चे रात्री ११.३० वाजता चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कार्यवाही करीत २ धारदार तलवारीसह आरोपीस ताब्यात घेऊन जेरबंद केले.
पुसद शहरातील संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या शेषराव उत्तम लोंढे वय २८ वर्ष याचे घरामध्ये २ धारदार तलवारी असल्याचा पोलिसांना सुगावा लागताच त्यांनी सापळा रचून आरोपीचे घरातील पलंगा खालून दोन लोखंडी स्टिल धातू असलेल्या तलवारी हस्तगत केल्या.
आरोपी शेषराव उत्तम लोंढे यांचे विरुद्ध अपराध नंबर ७५१/२०२४ कलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मा. कुमार चिंथा पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. हर्षवर्धन बी जे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पुसद, मा. ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात ए.पी.आय. गजानन गजभारे, पी.एस.आय. शरद लोहकरे, हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, संतोष भोरगे, मोहम्मद ताज, सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे यांच्या पथकाने कार्यवाही केली.