गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त सात आरोपी अटकेत..
पुसद येथे दिनांक 08/11/2024 रोजी विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने मा.नितेश शेंडे साहेब अधिक्षक,राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांच्या आदेशान्वये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुसद, दुय्यम निरिक्षक रा. उ. शु. पुसद बिट क्र. 1 आणि 2 यांच्या संयुक्त अवैद्य हातभट्टी निर्मिती केंद्र व विक्री केंद्र तसेच देशी दारू व विदेशी दारू अवैध्य विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहीम राबविण्यात आले आहे.
त्यामध्ये मौजे धुंदी ता.पुसद, दिग्रस तालुक्यातील, आर्णी तालुक्यातील ठिकाणी छापे मारून एकूण 07 गुन्हे नोंदविण्यात आले आहे त्यामध्ये 07 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले त्यात हातभट्टी दारू 540 लिटर, रसायन-6396 लिटर तसेच ताडी 70 लिटर एकूण अंदाजे किंमत रुपये 327095/- इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई मध्ये पुढील अधिकारी यांनी तसहभाग नोंदविला श्री.डी एस वाघ निरीक्षक पुसद, श्री.अनिल एन पिकले दुय्यम निरीक्षक पुसद, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमेश राठोड,जवान मानकर, रामटेके, बोंबले तसेच महिला जवान गट्टलेवार यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग नोंदविला..