पुसद येथे महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळावा..
दीर्घकाळ सत्ता असताना मूलभूत गरजांपासून मतदारसंघ वंचित– श्री शरद मैंद
1952 पासून एकाच घरामध्ये सत्ता आहे परंतु मागील काही वर्षापासून विधानसभा मतदारसंघाचा विकास भकास झाला आहे. एक सक्षम नेतृत्व म्हणून शरद मैंद यांना महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्यासमोरील तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उभाटा गट व काँग्रेस या पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी केले कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम ह्या होत्या पुसद विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार शरद महिंद यांचे प्रचारार्थ दिनांक सहा रोजी महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात महाविकास आघाडीचा घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मिळावा संपन्न झाला याप्रसंगी बोलताना उमेदवार श्री शरद मैन मनाली की महाविकास आघाडीचे मला संपूर्ण सहकार्य मिळत आहे परंतु आपल्याच पक्षाचे लोकांनी बंडखोरी केली त्याची दखल पक्षाने घेतली आहे महाराष्ट्र राज्याला दोन मुख्यमंत्री या मतदार संघाला व राज्याला मिळाले मागील 25 वर्षांपासून या मतदारसंघातील विकास रखडला मतदारसंघात अतिवृष्टी झाली शेती बाधित झाली परिस्थिती विदारक आहे दीर्घकाळ सत्ता असताना सुद्धा मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत काही गावात गेली 75 वर्षापासून एसटी गेलीच नाही आदिवासी वाड्यात अद्यापही स्मशानभूमी नाही मागील पाच वर्षात दलाल व कॉन्टॅक्टर यामध्येच लोकप्रतिनिधी अडून बसलेत 67 कोटी रुपयांची वाट योजनेचे काम झाले ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे यापूर्वी नळ योजनेचे काम झाले ते आजही बांगले आहे ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे.
मला उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची मी आभार मानतो महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी रिंगणात उभा आहे माझी निशाणी तुतारी वाजणारा माणूस असून या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने मतदान निवडून येतील अशी आशा आहे कार्यकर्त्यांनी मेहनत करावी कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मी ही निवडणूक जिंकणार आहे याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी वर्षाताई निकम डॉ. वजाहत मिर्झा शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे डॉक्टर मोहम्मद नदी म राका शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस जावेद हबीब एडवोकेट सचिन नाईक श्री अनुकूल चव्हाण राहुल सोनवणे जिल्हाध्यक्ष आरबीआय गवईगट रंगराव काळे एडवोकेट अनिल ठाकूर सिम्पल राठोड वसंतराव पाटील विजयराव चव्हाण आप्पाराव मैंद अर्जुन राव लोखंडे शिलानंद कांबळे ताहेरकाम पठाण विकास जामकर मधुकर चव्हाण आलमगीर सय्यद अन्वर ठेकेदार सय्यद जाहीर सय्यद इस्तियाक लियाकत खान राजेंद्र साकला रवी पांडे राजू वाकडे मालती मिश्रा नाना बेले नारायण शिरसागर साहेबराव ठेंगे नाना जळगावकर गोपाल मस्के पिंटू फुके विजय बाबर राहुल शेळके सुनील चव्हाण सचिन पवार पंडितराव देशमुख बालाजी कपडे केजी चव्हाण दीपक जाधव परमेश्वर जयस्वाल यांच्यासह हजारो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते संचालन यशवंतराव देशमुख तर आभार नितीन पवार यांनी मानले..