स्थानिक लोक प्रतिनिधिंनी ५वर्षात कुठला विकास केला? -खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल..
हेलिपेड ते सभास्थळ पर्यंत भव्य मोटार सायकल
(पुसद )मतदार संघाचा विकास करण्यासाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या स्थानिक लोक प्रतिनिधिने कुठला विकास केला?असा प्रश्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी चे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार शरद मैंद यांच्या प्रचारार्थ ते आज प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की
महाविकास आघाडीचे सरकार येणार 20 तारखेची वाट आहे.अजित पवार यांच्यावर टीका करताना गुलाबी रंगामधील गद्दारीचा काळा डाग आपल्याला पुसायचा आहे.
७१ हजार कोटीचा भ्रष्टाचार आरोप करायचा त्यांच्याकडेच सत्ता सूत्र सोपवायची हा कुठला न्याय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुसदच्या लोकप्रतिनिधींनी पाच वर्षात एखादा औद्योगिक प्रकल्प तरी आणला का?
विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महायुतीसरकार ने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर पंधरा दिवसात सातशे कोटी रुपये खर्च केले.
एका हाताने देणे आणि दहा हाताने काढून घेणे असा प्रकार सुरू आहे. 18% जीएसटी लावून महागाईचा भस्मासुर निर्माण केला. 140 रुपयाचं खोबरं २८०रुपये किलो झाले, खाद्यतेलाचा डब्बा 600 रुपयांनी वाढला. 2014 मध्ये कापसाचा भाव हजार रुपये होता. तो आता 6500 रुपये प्रतिक्विंटल झाला.
डीपी खताचे भाव चारशे रुपये 2014 ला होते ते आता सोळाशे रुपये झाले. कांद्याला निर्यात बंदी केल्याने कांद्याचे भाव गडगडले. सोयाबीन पिकालाही भाव नाही. गेल्या नऊ महिन्यात 1900 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
विकास तर नाही पण महाराष्ट्र भकास करून टाकलाय पवार साहेबांनी अपल्याला शरद मैंद हे माझे उमेदवार असल्याचे सांगून त्यांनी मैंद प्रचारासाठी मला विशेष करून पाठविले आहे.
पवार साहेबांचा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी पुसद मधील घराणेशाही संपवून सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून शरद मैंद यांना आमदार करण्यासाठी त्यांच्या अनुक्रमांक तीन वर असलेला तुतारी वाजवणारा माणूस बोधचिन्हा समोरील चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे त्यांनी आवाहन केले. खासदार संजय देशमुख यांनी माळ पठारावरील 42 गावांच्या समस्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मांडला. वर्ग दोन जमिनीचा प्रश्न येथील आमदारांना माहिती तरी आहे.
का. त्यांनी तो जीआर तरी वाचलाय का? असा प्रश्न उपस्थित करून क्रीडा संकुल आहे का अभ्यासिका आहे का तर मग आमदाराचे लक्ष कुठे आहे? असा प्रश्न खासदार संजय देशमुख यांनी केला . निलेश कराळे सर यांनी आपल्या शैलीत छोटे खाली भाषणात लाडकी बहीण योजनेवर खरमरीत टीका केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांनी सत्तधाऱ्यांनी मागील ३०वर्षात गिरण्या,,साखर कारखाने सहकारी संस्था बंद पडल्या, ग्रामीण भागात अद्याप ही एसटी पोहोचत नाही.
माळ पठारावरील चाळीसगाव पाणी समस्या, औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग नाहीत. शिक्षणाची पंढरी पुसद मध्ये शिक्षण संस्थेला घरघर लागली आहे नप शाळा बंद पडल्या आहेत. जनतेच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे मला सेवेची संधी द्यावी अशी विशाल सभेत मतदारांना विनंती केली.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट च्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ. मोहम्मद नदीम, शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे, अनिल पुली, माजी आमदार ख्वाजा बॅग, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विजयराव चव्हाण,रिपाई गवई जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे, विलास वाघमारे,यांनी शरद मैंद यांना विजयी करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांनी 72 वर्षापासून परिवाराकडे सत्ता आहे.
मात्र मागील ३०वर्षात गिरण्या साखर कारखाने सहकारी संस्था बंद पडल्या, ग्रामीण भागात अद्याप ही एसटी पोहोचत नाही. माळ पठारावरील चाळीसगाव यांच्या समस्या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग नाहीत. शिक्षणाची पंढरी म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या पुसद मध्ये शिक्षण संस्थेला घरघर लागली आहे नप शाळा बंद पडल्या आहेत. जनतेच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण झाल्या नाहीत.
त्यामुळे मला सेवेची संधी द्यावी अशी विशाल सभेत तमतदारांना विनंती केली. व्यासपीठावर आप्पाराव मैंद, अर्जुनराव लोखंडे,राहुल सोनुने, सिम्पल राठोड, मालती मिश्रा, विकास जामकर, राजू वाकडे, हरीश गुरुवाणी, विजय बाबर,रवी पांडे,राजीक देशमुख, विद्यांजली पोहरकर, पांडुरंग व्यवहारे, कल्पना व्यवहारे, जिया खान, शिलानंद कांबळे, मोहन विश्वकर्मा, सोमेश्वर जाधव, दिलीप बेंद्रे पाटील आदी उपस्थित होते.
संचालन यशवंत देशमुख तर नितीन पवार यांनी आभार मानले.तत्पूर्वी खासदार अमोल कोल्हे यांना हेलिपेड वरून सभास्थळ पर्यंत खुल्या जिप मध्ये बसवून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
पोटात बॉक्स
तिसरा डोळा आणि तिसरा नंबर
पुसद मतदारसंघातील मतदार हा भोळा आहे आणि भगवान शंकर सुद्धा भोळा आहे.
परंतु त्यांना तिसरा डोळा आहे.
शंकर जसा तिसरा डोळा उघडतो तसेच आपण तिसऱ्या नंबरचे बटन दाबून प्रस्थापिताची सत्ता उलटून टाका व शरद मैद यांना बहुमताने विजयी करा असे खासदार अमोल कोल्हे म्हणताच नागरिकानी प्रचंड टाळ्याचा गडगडाट केला.