पुसद येथे लोकनेते कै.देवराव पाटील चोंढीकर स्मृती व्याख्यान
पुसद : विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद व श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष, माजी आमदार तथा श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते कै.देवराव पाटील चोंढीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान पुष्पाचे आयोजन दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ शनिवार ला सायं. ठिक ६:०० वाजता श्री. शिवाजी विद्यालयाच्या कै.देवराव पाटील चोंढीकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
सदरहू व्याख्यान पुष्प ख्यातकीर्त संस्कृत विद्वान वक्तृत्वाचे धनी वाचस्पती प्राध्यापक डॉक्टर स्वानंद कुंड हे श्वास माझा हित व्हावे अर्थात समर्पण हेच जीवन व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत. अविरत चालणाऱ्या व्याख्यान पुष्पाचे हे ३७ वे वर्ष आहे.
पुसद शहर व परिसरातील नागरिकांनी या वैशिष्ट्यपूर्ण प्रेक्षणीय व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी, कार्याध्यक्ष माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, कोषाध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर यांनी केले आहे.