पुसद येथे लाचखोर डेपो मैनेजर पांडे एन्टीकरपशन च्या जाळ्यात…
पुसद :–आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे वय ४८ वर्ष पद आगार व्यवस्थापक, (वर्ग २) पुसद आगार ता. पुसद जि. यवतमाळ यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी ५ हजार रुपयाची लाच घेताना सापळा कारवाई करण्यात आली आहे…
तकारदार यांनी दिनांक ०३ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे वय ४८ वर्ष पद आगार व्यवस्थापक, (वर्ग २) पुसद आगार रा. प्रोफेसर कॉलनी पुसद यांनी रजा रोखीकरण रक्कम मंजुरी करीता तक्रारदारास लाचेची मागणी केली होती .
सदर लेखी तकारी वरून दिनांक ०३ डिसेंबर २०२४ व दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक मंगेश पांडे आगार व्यवस्थापक यांनी स्वतः करीता तक्रारदारास यांना त्यांचे रोखीकरण रजेचे पैसे मंजुरीसाठी स्वाक्षरी करण्यारीता २० हजार रूपये लाचेची मागणी करून त्यातून पहिला हप्ता ५ हजार रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.
त्यावरून दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी आयोजीत केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे वय ४८ वर्ष पद आगार व्यवस्थापक, (वर्ग २) पुसद आगार ता. पुसद जि. यवतमाळ यांनी आगार व्यवस्थापक कार्यालयातील त्यांचे कॅबीन मध्ये ५ हजार रूपये लाचरक्कम तक्रारदार यांचे कडुन पंचासमक्ष स्विकारली असता आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
सदरची कार्यवाही मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, सचींद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार पोहवा अतुल मते, पोहवा जयंत ब्राम्हणकर, पोना सचीन भोयर, सुधीर कांबळे, इफाज काझी व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दुरध्वनी कमांक ०७२३२-२४४००२ तसेच टोल फ्रि कमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उप-अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केले आहे.