निखिल सावंत दादासाहेब फाळके चित्रपट युनियन पुरस्काराने सन्मानित…

पुसद तालुक्यातील माळपठार म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या परिसरातील बेलुरा या छोट्याशा गावचे सुपुत्र निखिल दिनकरराव सावंत यांना दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबई (अजित म्हामुनकर) यांचे कडून दादासाहेब फाळके चित्रपट युनियन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबई स्थित क्षितिज वॉटर पार्क अँड बीच रिसोर्ट मुंबई येथे दि. 11 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते दादासाहेब फाळके चित्रपट युनियन पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.
चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या कलावंतांच्या कला गुनांना वाव देण्याचे दृष्टीने पुरस्कार देऊन कलाकारांना प्रोत्साहित करण्यात आले होते.
पुसद तालुक्यातील छोट्याशा बेलोरा या गावांमधून चित्रपट सृष्टी मध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या निखिल सावंत यांना उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता म्हणून पुरस्कार देत त्यांचा गौरव करण्यात आला.
पुसद तालुक्यातील बेलोरा अशा छोट्याशा गावांमधून मुंबई सारख्या मायानगरीमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये आपली वेगळीच छाप निर्माण करून भल्या भल्या दिग्गजांना भुरळ घालीत पुरस्कार पटकाविल्याबाबत निखिल सावंत यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे.
पुसद तालुक्यातून त्यांच्या चाहत्यांचा त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.